शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

जीव धोक्यात घालून धाडसाने वणवा विझविला

By admin | Updated: March 24, 2017 00:19 IST

वाईची तरुणाई : सोनजाई डोंगरावरील जीवसृष्टी अन् वनौषधी सुरक्षित

वाई : पर्यावरण रक्षणासाठी तरुणाई आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. वाईत पसरणी घाटात दुपारी सोनजाईच्या डोंगराला लागलेला वणवा जीव धोक्यात घालून अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने विझवून येथील तरुणाईने नवा आदर्श निर्माण केला आहे. डोंगरावरील वनऔषधी आणि झाडे वाचविण्याबरोबरच वन्यजिवांच्या रक्षणाचे मोठे कामही या तरुणांनी करून दाखविले आहे.वाई शहराच्या दक्षिण-उत्तर बाजूस ही डोंगर आहेत़ येथूनच पाचगणी, महाबळेश्वरला जाणारा पसरणी घाट आहे़ सोमवारी दुपारनतंर पसरणी घाटावरील सोनजाईच्या डोंगराला वणवा लागला़ या डोंगरावर वारंवार वणवा लागत असतो़ बघता-बघता सोशल मीडियावरून ही घटना सामाजिक संस्थांच्या गु्रपवरून फिरू लागली़ मग वाईतीलच प्रसाद सुळके, अनिल यादव, गणेश नेवसे, आशिष शिंदे, ऋषिकेश सरडे, विनय जमदाडे या तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून कोणतीही सुरक्षा साधने नसताना केवळ हिरव्या डाहाळ्यांच्या साह्याने वणवा आटोक्यात आणण्यास सुरुवात केली़ वाऱ्याचा जोेर, उंच वाळके गवत, वणव्याचा वाढता जोर या अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी वणवा विझविला व डोंगराचा काही भाग वाचविला़ दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत आहे़ हिरवेगार डोंगर काही दिवसांतच गवत वाळल्याने वाळून गेले़ पशू, पक्षी अनेक दुर्मीळ वन्यजिवांची अन्न, पाण्यासाठी वणवण सुरू आहे़ वाई तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत़ निसर्गाच्या वैविध्यतेने नटलेल्या या डोंगररांमध्ये अनेक दुर्मीळ वनस्पती, औषधी वनस्पती वास्तव्यास आहेत़; पण काही विघ्नसंतोषी लोकांकडून चुकीच्या गैरसमजुतीतून जाणीवपूर्वक या डोंगरांना आगी लावण्याचे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत़ वनविभागाने दोेषींचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा होताना दिसत नाही. त्यामुळे या वणवा लावणाऱ्या प्रवृत्तींचे फावताना दिसत आहे़ यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळताना दिसत आहे़ तरी वनविभागाने वणवा लावणाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेंमीकडून जोर धरू लागला आहे़ (प्रतिनिधी)