शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जिवाभावाचे मित्रवर्य : श्रीनिवास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:40 IST

श्रीनिवास पाटील हे माझे पुणे येथील सर परशुराम महाविद्यालयापासूनचे मित्र आहेत. त्यांचा व माझा १९५८ साली प्रथम परिचय झाला. ...

श्रीनिवास पाटील हे माझे पुणे येथील सर परशुराम महाविद्यालयापासूनचे मित्र आहेत. त्यांचा व माझा १९५८ साली प्रथम परिचय झाला. आमच्या दोघांच्या मैत्रीला आज थोडी-थोडकी नव्हे, तर तब्बल ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हापासून आमच्या मैत्रीचे जे सूर जुळले, ते आजपर्यंत.

खासदार श्रीनिवास पाटील यांच्याबद्दलच्या खूप सार्‍या आठवणी मनात ताज्या आहेत. कऱ्हाडसारख्या लहान गावातून शिक्षणासाठी प्रथमच पुण्याला आले. दहावीच्या परीक्षेत त्यांनी श्री शिवाजी विद्यालय, कराड या त्यांच्या शाळेत प्रथम क्रमांक पटकावला होता. प्रसन्न व रुबाबदार हसरा चेहरा व बोलण्यातला गोडवा, यामुळे लवकरच ते आमच्या मित्रमंडळीत विद्यार्थीप्रिय बनले होते. त्यांच्या वागण्या व बोलण्याच्या चालीवरून आम्हाला त्याचवेळी त्यांच्या नेतृत्वगुणांची झलक दिसून आली होती. त्यांच्या मागे-पुढे नेहमी वसतिगृहातील ५-१० मित्रमंडळींचा घोळका असायचा. महाविद्यालयात त्या काळात दरवर्षी सर्व विद्यार्थ्यांमधून एक महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतिनिधी पदाची निवडणूक होत असे. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या गुणवत्तेवर सतत दोन वर्षे त्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळविला होता. ग्रामीण भागातून आलेल्या या युवकाने मिळवलेले हे स्पृहणीय यश सर्वांनाच त्यावेळी विस्मयकारक वाटून गेले होते. त्यांना नृत्याची विशेष आवड होती. आंतरराज्य महाविद्यालयीन समूहनृत्य स्पर्धेच्या म्हैसूर येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी भाग घेऊन आमच्या महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळवून दिला. यासाठी त्यांनी त्यावेळचे नृत्य दिग्दर्शक सुरेंद्र वडगावकर यांच्याकडून खास प्रशिक्षण घेतले होते व खूप दिवस त्याचा सराव केला होता. त्यामुळेच हे यश प्राप्त झाले. महाविद्यालयात त्यांनी शारीरिक शिक्षणाऐवजी एन. सी, सी.ची निवड केली होती. या अभ्यासक्रमाचा सखोल बारकाईने अभ्यास करून त्यांनी याही क्षेत्रात अंडर ऑफिसर हे सर्वोच्च पद आपल्या गुणवत्तेवर मिळविले होते. एन. सी, सी. कँपमध्ये त्यांच्याबरोबर घालविलेले ते दिवस - गप्पा-गोष्टी, किस्से, गाणी आजही माझ्या चांगली स्मरणात आहेत.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्याचवेळी ते स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा तयारी करत होते. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन ते महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्यात रुजू झाले. प्रत्येक ठिकाणी तन, मन वेचून कार्य करण्याची सवय व अंगी असलेल्या शिस्तप्रियतेने क्रमा-क्रमाने त्यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त पदापर्यंत मजल मारली. त्यांची पुण्याला जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. साधी राहणी व उच्च विचारसरणी ही त्यांची जीवनधारणा आहे. त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. साधा,सरळ, निगर्वी, प्रेमळ कष्टाळू स्वभाव, गरिबांविषयी आपुलकी, माया, माणुसकी, स्पष्टवक्तेपणा, पारदर्शकता व प्रामाणिकपणा यामुळे जनमानसात त्यांच्याबद्दल आदर व प्रेम दिसून येते. कामाचा कितीही व्याप असला तरी ते रात्री झोपण्यापूर्वी न चुकता आठवणीने दिवसभराच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींची डायरीत नोंद करतात. आपल्या मित्रमंडळींना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आवर्जून अभिनंदनाचे फोन करतात. सभा-समारंभ, विवाह निमंत्रणांना ते उपस्थित राहतात. जाणे शक्य होत नसल्यास त्याला आपल्या स्वाक्षरीने उत्तर हे पाठविले जातेच. त्यांचे मराठी शुद्धलेखनाकडे फार बारीक लक्ष असते. एखाद्या शब्दाच्या ऱ्हस्व-दीर्घ याबाबत त्यांना थोडी जरी शंका आली, तर ते त्यासाठी त्या विषयातल्या जाणकाराला संकोच न करता विचारतात व योग्य ती दुरुस्ती करतात. परमेश्वर कृपेने आपल्याला जी पदे जीवनात मिळाली आहेत, ती केवळ मोठेपणा मिरवण्यासाठी नसून त्यांचा उपयोग समाजातील गोरगरीब लोकांना झाला पाहिजे, यावर त्यांचा नेहमी कटाक्ष असतो. याचा अनुभव लोकांनी ते लोकसभेचे खासदार तसेच सिक्किमचे राज्यपाल असताना घेतलेला आहे.

एक प्रसंग आठवतो. एकदा आम्ही दोघे त्यांच्या गाडीतून एकादशीला आळंदीला जात होतो. वाटेत जाताना आम्हाला एक वृद्ध वारकरी अनवाणी हातात पताका घेऊन एकटाच उन्हातून घामाघूम अवस्थेत आळंदीला चाललेला दिसला. पाटील यांनी त्याला पहिले व गाडी थांबवली व स्वतः उतरून त्या वारकऱ्यास आपल्या गाडीत घेतले. तांबड्या दिव्याची गाडी पाहून तो वारकरी गाडीत बसताना खूपच संकोचला होता. आम्ही त्याला आळंदीला मंदिरापाशी सोडल्यानंतर त्याला झालेला आनंद, समाधान, त्याची कृतज्ञतेची भावना व त्याने दिलेला आशीर्वाद... हा सारा प्रसंग आजही माझ्या अगदी स्मरणात आहे.

श्रीनिवास पाटील यांचे लोककलवेर विशेष प्रेम आहे. मराठी लोककला, तमाशा – लावण्या याबद्दलचे त्यांचे प्रेम सर्वांनाच माहीत आहे. याशिवाय त्यांना अभंग-भजन-कीर्तन-प्रवचन याचीही प्रचंड आवड आहे. ग. दि. माडगूळकर यांची अनेक गीते त्यांना तोंडपाठ आहेत. गजाननराव वाटवे, सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी, पु. ल. देशपांडे हे त्यांचे आवडते कलाकार आहेत. दर्जेदार चित्रपटांचे ते खास शौकीन आहेत.

लोकांची कामे करण्याची त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे. एखाद्याचे काम होण्यासारखे असेल तर ते त्यासाठी जिवापाड प्रयत्न करतील. पण जर ते काम नियमात बसत नसेल, अवैध असेल, तर त्या माणसाला, हे काम माझ्याकडून होणार नाही, असे स्पष्टपणे सांगतात. कोणालाही खोट्या आशेला लावून त्याला निष्कारण हेलपाटे मारायला लावणे त्यांच्या नियमात बसत नाही.

परमेश्वराने त्यांना विलक्षण स्मरणशक्ती व अमोघ वक्तृत्वशैलीची देणगी दिली आहे. त्यांचे भाषण म्हणजे हशा, टाळ्या आणि विनोदी किस्से. ती एक प्रकारची बौद्धिक मेजवानीच असते. पुणेकरांना याचा पुरेपूर अनुभव आलेला आहे. वक्तशीरपणा याबद्दल त्यांची विशेष ख्याती आहे.

आपल्या संपर्कात आलेल्या माणसाला ते अनेक वर्षांनंतर भेटले तरी, त्याला त्याच्या नावानिशी बरोबर ओळखतात. इतकेच काय, जवळजवळ २००-३०० लोकांचे फोन नम्बर त्यांना तोंडपाठ आहेत. आभाळाएवढे यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत हे विशेष.

श्रीनिवास पाटील यांच्या या यशात सौ. रजनी वहिनींचा खूप मोठा वाटा आहे. श्रीनिवास पाटील यांच्या पाठीमागे त्या खंबीरपणे उभ्या आहेत, म्हणूनच ते आपल्या कार्यात उंच भराऱ्या मारू शकतात. त्यांचा मुलगा सारंग उच्चशिक्षित आहे. तोही आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकारणात व राजकारणात आपले योगदान देत आहे.

पुष्कळ वेळा असा अनुभव येतो की, माणसे खूप मोठ्या उच्च पदावर गेल्यानंतर ते आपल्याबरोबरच्या मित्रमंडळींना विसरतात अथवा जाणीवपूर्वक टाळतात. परंतु श्रीनिवास पाटीलसाहेब या गोष्टीला शतप्रतिशत अपवाद आहेत. आपल्या जीवनात त्यांनी खूप माणसे जोडली आहेत. कृतज्ञता हा त्यांचा स्थायीभाव आहे. आमच्या वैद्य कुटुंबाचे ते फ्रेंड, फिलॉसफर, गाईड आहेत. मी तर त्यांना माझे थोरले बंधूच मानतो. आमची मैत्री ही राजकारणविरहित आहे. पुष्कळ वेळा मला असे वाटते की, कदाचित त्यांचे व माझे मागील जन्माचे ऋणानुबंध असावेत.

आज त्यांचा वाढदिवस... परमेश्वराने त्यांना जनतेची सेवा करण्यासाठी दीर्घायुष्य द्यावे, हीच यानिमित्ताने विनम्र प्रार्थना!

।। जीवेत्‌ शरद: शतम् ।।

. रमेश वैद्य

सिंगापूर

(सेवानिवृत्त प्राचार्य, भारत इंग्लिश स्कूल, शिवाजीनगर, पुणे )

फोटो :10 pramod02