शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

साताऱ्यात जेसीबीची सात वाहनांना धडक नऊजण जखमी : ब्रेक निकामी - चालकाचा सुटला ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:40 IST

सातारा : अदालतवाडा परिसरात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जेसीबीचा ब्रेक निकामी झाल्याने रस्त्याकडेला उभ्या असणाºया सहा वाहनांना धडक बसली.

ठळक मुद्देशहरातील भर वस्तीतील घटनेने खळबळ

सातारा : अदालतवाडा परिसरात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जेसीबीचा ब्रेक निकामी झाल्याने रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या सहा वाहनांना धडक बसली. या अपघातात नऊजण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, समर्थ मंदिर बाजूकडून नगरपालिकेच्या दिशेने येणाºया जेसीबीचा (एमएच १२ एफबी १३९४) ब्रेक फेल झाला. अदालतवाडा परिसरातील उतारावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन कारला धडक दिली. त्यानंतर रिक्षा आणि समोरून येणाºया तीन दुचाकींनाही ठोकर मारली. यात नऊजण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सनी विजय पिंपळे (वय २१, कारी, ता. सातारा), सतीश यादवराव मोरे (४३, नुने, ता. सातारा), वैयजंता रावजी डोईफोडे (३०, समर्थनगर) कुंदन जगन्नाथ शेंडे (शाहूपुरी) अशी जखमींची नावे आहेत. तर जेसीबी चालक हर्षद राजा अन्सारी (२२, समर्थ मंदिर) याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात तीन कार, तीन दुचाकी व एका रिक्षाची मोडतोड होऊन नुकसान झाले आहे. या अपघातानंतर अनेकांना काळजी लागली होती. नेमक कोण जखमी झालय, याची चौकशी लोक करत होते.कारखाली दुचाकी..जेसीबीने उभ्या कारला धडक दिल्यानंतर कार पाठीमागे असलेल्या दुचाकीवर जाऊन आदळली. एवढेच नव्हे तर कारच्या पाठीमागील चाकाखाली दुचाकी अडकली. त्यामुळे दुचाकीचा चुराडा झाला. 

मुलीला आली भोवळबारा वर्षांची एक मुलगी घटनास्थळी अपघात पाहण्यासाठी आली होती. गाड्यांचा झालेला चुराडा आणि अपघाताची भीषणत: पाहून तिला भोवळ आली. काही नागरिकांनी तिला तत्काळ पाणी पाजले. मात्र, तरीही ती शुद्धीवर येत नव्हती. अखेर तिला एका घरात नेण्यात आले. काही वेळानंतर संबंधित मुलगी शुद्धीवर आली. 

पित्याची परवड..अपघातात अवघ्या तीन वर्षाची मुलगी जखमी झाल्यानंतर तिच्या वडिलाने तिला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तिला उपचारासाठी दवाखान्यात घेतलं. त्यामुळे पुन्हा ते सिव्हिलला आले.मोठा अनर्थ टळलासमर्थ मंदिर रस्त्याच्या कडेला महावितरण कंपनीचा डीपी आहे. जेसीबी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानंतर उताराने वाहन येत असताना चालकाने प्रसंगावधान राखत जेसीबी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही आधार मिळत नसल्याने चालकाने बाजूच्या वाहनांना धडक दिली. दोन कारला धडक बसल्यानंतर जेसीबीचा वेग कमी झाला. जेसीबी डिपीजवळ येत असताना डीपीच्या कडेला असलेल्या छोट्या कड्यामुळे जेसीबी थांबला. तसेच दुपारच्या वेळी रहदारी संख्या कमी असल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.