शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

मृत्यूच्या जबड्यातून पुन्हा एकदा जीवनाच्या कुशीत

By admin | Updated: May 11, 2014 23:59 IST

मोहन मस्कर-पाटील ल्ल सातारा सातारा जिल्ह्यात ‘एमडीआर-टीबी’ रुग्णांचे उपचार करवून घेण्याचे प्रमाण शंभर टक्के असल्यामुळे शंभरपैकी ८१ रुग्ण

 मोहन मस्कर-पाटील ल्ल सातारा सातारा जिल्ह्यात ‘एमडीआर-टीबी’ रुग्णांचे उपचार करवून घेण्याचे प्रमाण शंभर टक्के असल्यामुळे शंभरपैकी ८१ रुग्ण ‘एमडीआर-टीबी’ सारख्या महाभंयकर रोगापासून मुक्ततेकडे वाटचाल करू लागले आहेत. मृत्यूच्या जबड्याकडे गेलेले हे रुग्ण पुन्हा एकदा जीवनाच्या कुशीत आणणारा ‘एमडीआर-टीबी’ मुक्तीचा ‘सातारा पॅटर्न’ आता राज्यात लक्षवेधी ठरला आहे. याचे संपूर्ण श्रेय सातारा जिल्हा क्षयरोग केंद्रातील वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ. पृथ्वीराज भोसले आणि त्यांच्या सहकार्‍यांना जाते. राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वात चांगले असून, महाराष्ट्राची सरासरी २७ टक्के आहे. जगभरात ‘मोस्ट किलिंग डिसीज’ (मृत्यू होणारा आजार) म्हणून ‘एमडीआर-टीबी’ची ओळख झाली आहे. डॉ. नितीन भालेराव, डॉ. पृथ्वीराज भोसले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी राबविलेल्या शोधमोहिमेनंतर जून २०१२ मध्ये वाई तालुक्यात ‘एमडीआर-टीबी’चा पहिला रुग्ण आढळला. यानंतर जिल्ह्यात १२५ रुग्ण आढळले. हा आजार ‘टीबी’ झालेल्या रुग्णांनाच होतो. ‘टीबी’ तथा ‘क्षयरोग’ झालेला रुग्णाने औषधे घेताना धरसोड वृत्ती केली तर त्याला ‘एमडीआर-टीबी’ तथा ‘मल्टी ड्रग रेझिस्टन्स’ होतो. या आजाराला ‘विचित्र’ अथवा ‘कोडगा’ म्हणूनही ओळखले जाते. यासाठी सरकार एका रुग्णांवर वर्षाकाठी जवळपास चार ते साडेचार लाख रुपये खर्च करते. ‘टीबी’ बरा होण्यास सहा ते सात महिने तर ‘एमडीआर-टीबी’ बरा होण्यास दोन वर्षे लागतात. यावर शासनाकडून होणारा खर्च आणि कालावधी लक्षात घेता त्याची दाहकता लक्षात येते. ‘एमडीआर-टीबी’ रुग्णांना पुन्हा एकदा जीवनाच्या कुशीत आणण्याचे काम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्याने सर्वाधिक चांगले केले आहे. ‘एमडीआर-टीबी’ रुग्णांनी सातारा जिल्हा क्षयरोग केंद्राने स्वत:चे एक प्रतिमान तयार केले आणि त्यानुसार उपचारपद्धती सुरू ठेवली आहे. ‘एमडीआर-टीबी’चा रुग्ण निश्चित झाल्यानंतर त्याला तत्काळ सात दिवसांत औषधे सुरू होतात. संबंधित रुग्णाची गुप्तता तर पाळलीच जाते, त्याचबरोबर तो औषधोपचार नियमित घेतो की नाही, याचा प्रत्येक आठवड्याला आढावा घेतला जातो. आशा वर्कर्स, परिचारिका त्यांच्या घरी वारंवार भेटी देतात. राज्यात इतर जिल्ह्यांत मात्र, सातार्‍यासारखी तत्परता दिसून आलेली नाही. परिणामी महाराष्ट्रात ‘एमडीआर-टीबी’ रुग्ण बरे होण्याकडे वाटचाल करण्याचे प्रमाण २७ टक्के इतके आहे आणि सातारा जिल्ह्याचे ८१ टक्के आहे. विशेष म्हणजे ‘एचआयव्ही-एमडीआर-टीबी’ रुग्ण कव्हर करणे अवघड असते. सातारा जिल्हा क्षयरोग केंद्रात मात्र, त्याच्या उलट आहे. येथे या आजारांच्या रुग्णांना कव्हर करण्यात बर्‍यापैकी यश आले आहे.