शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

साताऱ्यात घुमला ‘जय मल्हार’

By admin | Updated: July 15, 2014 01:25 IST

धनगर समाज : अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा

सातारा : एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी सातारा जिल्हा धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबाजावणी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढला. या मोर्चात धनगर समाज पारंपरिक वेशभूषा, गजीढोल व मेंढ्यांसह सहभागी झाला होता. दरम्यान, आमच्या आरक्षणावर तातडीने निर्णय न झाल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. बसस्थानकापासून दुपारी बारा वाजता मोर्चास सुरुवात झाली. पोवई नाक्यावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरक्षणासंदर्भात मागणी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील धनगर समाज मागील सुमारे ६५ वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबाजवणीपासून वंचित आहे. भारतीय राज्य घटनेच्या अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर समाजाचा समावेश असूनही केवळ राज्य शासनाने केंद्राकडे शिफारस न केल्यामुळे या समाजाला सवलतीचा लाभ मिळत नाही. वेळोवेळी आंदोलने करूनही याची दखल घेण्यात आलेली नाही. सध्या संपूर्ण राज्यात धनगर समाज आरक्षण अंमलबजावणीसाठी शासानाच्या विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे, बाळासाहेब खरात, रामदास सरगर, अशोक शेडगे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)