शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

मारला धक्का तरी पडेल कठडा...

By admin | Updated: January 15, 2015 23:33 IST

सालपे घाट : बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष; प्रवाशांचा जीव धोक्यात; उपाययोजना करण्याची मागणी

पिंपोडे बुद्रुक : सालपे घाटातील संरक्षक कठडे जीर्ण झाले आहेत. हाताने कठडा ढकलला तरी तो ढासळत आहे. त्याचबरोबर रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांसह घाटातील प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे. बांधकाम विभागाचे मात्र या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याने दिसून येत आहे.सातारा-पुणे राज्य महामार्गावर वाठारस्टेशनपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर हा घाट आहे. घाटाच्या पायथ्याला सालपे गाव असल्यामुळे या घटाला सालपे घाट असे संबोधले जाते. घाटाची लांबी दोन किलोमीटरच्या आसपास आहे. घाटाच्या अलिकडे आदर्की फाट्यावर वाठार पोलिसांची आणि घाट पायथ्याला लोणंद पोलिसांची मदत केंद्रे आहेत. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोल वाचविण्यासाठी अनेक अवजड वाहने साताऱ्याहून लोणंद मार्गे पुणे-मुंबईच्या दिशेने जात असतात. त्याचबरोबर दौंड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला जातो. सध्या लोणंद आणि शिरवळ येथे नव्याने विकसीत होत असलेली औद्योगिक वसाहत आणि नागरिकीकरणामुळे या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या घाटाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचेच दिसून येते. घाटात यापूर्वी बऱ्यावेळा अपघात झालेले आहेत. मात्र अद्यापही त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष होत असल्याची भावना प्रवाशी व वाहनचालकांमध्ये निर्माण झालेली आहे. गेल्या कित्येक वर्षांपूर्वी घाटातील संरक्षक कठडे बांधण्यात आले आहेत. मात्र सध्या त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. हाताने कठडा ढकलला तरी तो ढासळत आहे. तो संरक्षण कठडा वाहनांचे संरक्षण काय करणार? हाच खरा प्रश्न आहे. घाट रस्त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मोठी दुर्घटना घडल्यासच लक्ष देणार का? असा प्रश्न वाहनचालक करीत आहेत. (वार्ताहर)अपघातांचे प्रमाण वाढलेगेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी वाठारस्टेशनच्या बाजूने घाटमाथ्यावरील १०० मीटर अंतरावर संरक्षक कठडे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर खडी विखुरली आहे. त्या खडीवरून घसरून दुचाकीस्वारांचे अपघात वाढले आहेत. मोठ-मोठे खड्डे आणि तीव्र चढ-उतारामुळे अवजड वाहने कमी वेगाने चालवावी लागतात. या संधीचा फायदा घेऊन ट्रक अथवा ट्रेलरच्या मागील बाजूने गाडीत चढून साहित्याची चोरी करणाऱ्या टोळ्याही कार्यरत आहेत.घाटातील दगडी संरक्षक कठडे पन्नास ते साठ वर्षांपूर्वीचे आहेत. त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधीची तरतूद व्हावी, यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाईल.- के. पी. मिरजकर, उपअभियंता, बांधकाम उपविभाग, खंडाळाअर्धा घाट रस्ता खराब आहे. संरक्षक कठड्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. चालकाचे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी हा घाट जीवावर बेतू शकतो. त्यामुळे संरक्षक कठड्यांचे मजबुतीकरण करणे गरजेचे आहे. वसंतराव इंगवले, वाहनचालकबारामती