शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

राज्याच्या तिजोरीतून पैसे आणणे सोपे नाही: रामराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:03 AM

सातारा : ‘राज्याच्या तिजोरीतून पैसे आणणे वाटते तेवढे सोपे नाही, त्यामुळे मिळालेल्या पैशांतून जी कामे होतात, ती गुणवत्तापूर्ण व्हावीत, यासाठी अभियंता मंडळींनी काटेकोर लक्ष ठेवणे आवश्यक आहे,’ असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित केलेल्या आदर्श अभियंता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते ...

सातारा : ‘राज्याच्या तिजोरीतून पैसे आणणे वाटते तेवढे सोपे नाही, त्यामुळे मिळालेल्या पैशांतून जी कामे होतात, ती गुणवत्तापूर्ण व्हावीत, यासाठी अभियंता मंडळींनी काटेकोर लक्ष ठेवणे आवश्यक आहे,’ असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित केलेल्या आदर्श अभियंता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, बाळासाहेब भिलारे, सभापती राजेश पवार, मनोज पवार, शिवाजी सर्वगोड, वनिता गोरे, मिलिंद कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास श्ािंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे आदींची प्रमुख उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ‘दर्जेदार रस्ते आणि शेती, उद्योगाला पाण्याची व्यवस्था करण्यावर भर दिल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भाग शहरांशी जोडला गेला. ग्रामीण भागातला शेतीमाल चांगल्या रस्त्यांमुळे मोठ्या शहरांत पाठवला जाऊ शकतो.दूध, भाजीपाला हा नाशवंत माल लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची गरज असते. यासाठी रस्ते चांगले हवेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यांची अवस्था दयनीय आहे. यासाठी रस्ते तयार करतानाच ते दर्जेदार कसे होतील, याकडे अभियंत्यांनीच लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागाच्या विकासात अभियंत्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. लोकांच्या अपेक्षांना लोकप्रतिनिधी तोंड देतात, त्यासाठी अभियंत्यांचीही साथ हवी.’‘फलटणपासून साताऱ्यात येणाºया रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. यासाठी मोठे अंतर कापून दुसºया मार्गाने आम्हाला या कार्यक्रमाला यावे लागले. त्यामुळे रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यावर सर्वांनीच भर दिला पाहिजे. रस्ता चांगला नाही, याला केवळ अभियंते जबाबदार नसून लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत.’या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अभियंता दिलीप जाधव, महेश टिकोले, जनार्दन धायगुडे यांना पुरस्कार देण्यात आले. यावेळीतेव्हाही गाड्या नव्हत्या‘कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून झालेल्या धरणांच्या कामावेळी अधिकाºयांना गाड्या नव्हत्याच. आताही गाड्या नसल्याच्या तक्रारी अभियंत्यांकडून येतात. तेव्हा ज्या कंत्राटदाराला कामाचे टेंडर देणार आहात, त्याला अधिकाºयाला वाहन देण्याची ‘कंडिशन’ त्याच्या टेंडरमध्येच घाला, तुम्ही घरात बायकोला घाबरत नाही तर आॅडिटला कसे घाबरता?,’ असे रामराजेंनी सांगताच सभागृहात हशा पिकला.