शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी दहा ते दुपारी दोन कोरोना नाही का? : उदयनराजेंचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 18:45 IST

दहा ते दोन या वेळेत कोरोना नसतो का? आणि दोन नंतर तो बाहेर पडतो का?, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांची व्यथा मांडली आहे.

ठळक मुद्देसकाळी दहा ते दुपारी दोन कोरोना नाही का? : उदयनराजेंचा सवालकायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी योग्य निर्णय घ्यावा

सातारा : कोरोनाच्या महामारीत देखील राजधानीचे दिल्ली शहर सुरू ठेवण्यात आलेले आहे, मग साताऱ्यात कशासाठी लॉकडाऊन करण्यात येते. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत केवळ दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश प्रशासन देत आहे, मला प्रश्न पडतो की दहा ते दोन या वेळेत कोरोना नसतो का? आणि दोन नंतर तो बाहेर पडतो का?, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांची व्यथा मांडली आहे.खासदार उदयनराजे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डॉक्टरांसोबत घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.खासदार उदयनराजे म्हणाले, ''कोरोनाशी लढताना लॉकडाऊन हा उपाय नाही. प्रशासन लोकांना किती दिवस दामटून ठेवणार आहे. लोकांनी व्यवसायासाठी बँकांची कर्ज घेतले आहेत. जरी हप्ते भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली असली तरी देखील त्यानंतर त्यांना व्याजासहित कर्जाच्या रकमा भराव्य लागणार आहेत.

अशा परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जिल्हाधिकाऱ्यांवर कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या संख्येपेक्षा कितीतरी पट लोकसंख्या आहे. भविष्यामध्ये चोऱ्यामाऱ्या तसेच इतर गुन्हे वाढू शकतात, हे लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले पाहिजेत.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून सुरुवातीच्या स्टेजमध्ये ज्यांना लक्षणे दिसून आली आहेत. त्यांना सेंटरमध्ये न नेता त्यांना होम कॉरनटाईन होण्यास मुभा देण्यात यावी. कारण कॉरनटाईन सेंटरमध्ये उपासमार होऊ लागली आहे, तसेच एकमेकांच्या संपर्कामुळे त्याठिकाणी कोणाची संसर्ग वाढू शकतो.

जिल्हा शासकीय रुग्णालयमध्ये नर्सिंग स्टाफची भरती करणे तसेच तज्ञ फिजिशियन उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे. खासगी तज्ञ डॉक्टर्स जिल्हा रुग्णालयात सेवा देण्यासाठी तयार आहेत; परंतु त्यांना अल्प मानधन दिले जाते. त्याउलट खासगी दवाखान्यात चालून त्यांना चांगले पैसे मिळतात, त्यामुळे सरकारनेच आपले धोरण बदलणे गरजेचे आहे. खासगी डॉक्टरांना नेमणूक देताना त्यांना मानधन वाढवून द्यावे, तसेच कंपन्यांचा सीएसआर फंड विरोधातील लढाईत वापरावा.पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री यांच्याकडे लोकांनी लॉकडाऊन बाबतचा तसेच कोरोना वाढीसंदर्भातल्या अनेक तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, त्याबाबत उपाययोजना होताना दिसत नाहीत. या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले या दोघांशीही मी चर्चा करतो नंतर तुम्हाला उत्तर देतो.आमदार, खासदार यांचा फंड वापराकोरोनाशी लढा देत असताना आर्थिक समस्या पुढे येत आहे, अशा वेळी आमदार-खासदार यांचे फंड या लढ्यामध्ये विना अटी-शर्तीचे वापरले गेले पाहिजेत, असा अशा सूचना देखील उदयनराजे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले