शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘आयपीएल’वर सट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:21 IST

कºहाड : आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाचजणांना पोलिसांनी अटक केली. शहरातील रविवार पेठेत असणाºया कोष्टी गल्लीत सोमवारी दुपारी साताºयाच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या सट्टेबाजांकडून पोलिसांनी दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.संदीप शशिकांत पवार (वय ३३, रा. रविवार पेठ, कºहाड), अमोल शंकर दावणे (२९, रा. बाराडबरी झोपडपट्टी, ...

कºहाड : आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाचजणांना पोलिसांनी अटक केली. शहरातील रविवार पेठेत असणाºया कोष्टी गल्लीत सोमवारी दुपारी साताºयाच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या सट्टेबाजांकडून पोलिसांनी दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.संदीप शशिकांत पवार (वय ३३, रा. रविवार पेठ, कºहाड), अमोल शंकर दावणे (२९, रा. बाराडबरी झोपडपट्टी, कºहाड), विजय विलास चव्हाण (३५, रा. सोमवार पेठ, कºहाड), अमोल जयवंतराव पवार (३५, रा. रविवार पेठ, कºहाड), विजय विष्णू वायदंडे (३५, रा. बुधवार पेठ, कºहाड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गत महिन्यापासून ‘आयपीएल २०१८’ या क्रिकेट मॅच सुरू आहेत. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण टीव्हीद्वारे दाखविले जात आहे. कºहाडात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावला जात असल्याची माहिती साताºयाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्या अनुषंगाने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह कर्मचाºयांचे एक पथक तयार करून या माहितीची खातरजमा करण्याची सूचना दिली. पथकाने साध्या वेशात शहरामध्ये फिरून याबाबत माहिती संकलित केली. त्यावेळी रविवार पेठेतील कोष्टी गल्लीत सट्टा लावला जात असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.गुन्हे शाखेचे पथक सोमवारी दुपारी तातडीने कºहाडात दाखल झाले. त्यांनी कोष्टी गल्लीत एका घराच्या आडोशाला अचानक छापा टाकला. त्यावेळी संदीप पवार हा आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेत असल्याचे आढळून आले. तसेच सट्टा लावण्यासाठी आलेल्या इतर चारजणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबतची नोंद कºहाड शहर पोलिसांत झाली आहे.विजेत्यास हजारला हजार रुपयेसंदीप पवार याने संघांवर सट्टा म्हणून सोमवारी मोठी रक्कम जमा केली होती. विजयी संघावर पैज म्हणून तो हजार रुपयांना हजार रुपये अशी रक्कम देणार होता. मात्र, पोलिसांनी छापा टाकून सट्टेबाजांना गजाआड केले. त्यांच्याकडून ९२ हजार ६०५ रुपयांची रोकड तसेच एक लाख ८ हजार ५०२ रुपयांचे आठ मोबाईल असा २ लाख १ हजार १०७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.