शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

Remidesivir Satara : रुग्णांसाठीची रेमडीसिविर इंजेक्शन्स चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 11:57 IST

corona virus Remidesivir Satara : विना परवाना आणि मूळपेक्षा अधिक किमतीला रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन जाणारा प्रशांत सावंत हा रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनची चोरी करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तर याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत रेमडेसिविरच्या १२ इंजेक्शन वायल हस्तगत केल्या असून यामध्ये संबंधित रुग्णालयातील काहीजण त्याला मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्देरुग्णांसाठीची रेमडीसिविर इंजेक्शन्स चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न१२ इंजेक्शन्स हस्तगत : प्रशांत सावंतला रुग्णालयातील काहींची मदत

सातारा : विना परवाना आणि मूळपेक्षा अधिक किमतीला रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन जाणारा प्रशांत सावंत हा रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनची चोरी करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तर याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत रेमडेसिविरच्या १२ इंजेक्शन वायल हस्तगत केल्या असून यामध्ये संबंधित रुग्णालयातील काहीजण त्याला मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखेस मिळालेल्या माहित्या आधारे सोमवारी रात्री शहरातील समर्थ मंदिर परिसरात प्रशांत दिनकर सावंत (वय २९) आणि सपना प्रशांत सावंत (वय २५, दोघेही रा. मंगळवार पेठ, सातारा) यांना विना परवाना व मूळ विक्री किमतीपेक्षा अधिक दराने देण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन जाताना पकडले होते. त्यानंतर याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे हे करीत आहेत.या तपासादरम्यान, रेमडीसिविर इंजेक्शन विक्री केली आहे, असे साक्षीदार निष्पन्न झाले. यामध्ये सौरभ प्रकाश पवार (रा. खेड, सातारा) याने प्रशांत सावंत व सपना सावंत यांना रेमडीसिवीर इंजेक्शन वायल विक्री करण्यासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली होती. तर याप्रकरणात आतापर्यंत पवार याच्याकडून ९ इंजेक्शन्स वायल जप्त करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे एकूण १२ इंजेक्शन वायल जप्त केल्या आहेत. याची किंमत ३५४८० रुपये आहे.प्रशांत सावंत सर्जीकल वॉर्डचा इनचार्ज...पोलिसांच्या तपासात प्रशांत सावंत हा शहरातील समर्थ मंदिर परिसरातील एका रुग्णालयातील सर्जिकल वॉर्डचा इनचार्ज आहे. तो दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईक तसेच रुग्णालयाकडून मिळालेली रेमडीसिविरची ६ इंजेक्शन ताब्यात घ्यायचा. इंजेक्शनची एक वायल १०० एमएलची असते.

पहिल्या दिवशी रुग्णाला दोन इंजेक्शन दिली जातात. पण, सावंत हा रुग्णाला एक देऊन दुसरी स्पेअर करुन ती घरी नेऊन ठेवत होता. त्यानंतर रुग्णाला उर्वरित देण्यात येणाऱ्या ४ रेमडेसिविर इंजेक्शन वायल एक दिवसाआड देऊन २ स्पेअर करीत असे. तसेच या मध्ये रुग्णालयातील काही स्टाफ सावंतला मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याremdesivirरेमडेसिवीरCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर