शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या बाल पत्रकारांची रंगली शरद पवारांसोबत मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:37 IST

सातारा : ‘तुम्ही राजकारणात आला नसता तर नेमके काय बनला असता?’ असा धाडसी प्रश्न एका चिमुकल्यानं विचारताच ज्येष्ठ नेते शरद पवार दिलखुलास हसले. आजूबाजूला असलेल्या डझनभर लोकप्रतिनिधींना त्यांनी हाच प्रश्न मोठ्या कौतुकानं पुन्हा एकदा ऐकविला. विशेष म्हणजे हा सारा प्रकार पाहताना उपस्थित लोकप्रतिनिधी अवाक् बनले.बालदिनाचं औचित्य साधून ‘लोकमत’च्या विशेष पानासाठी ...

सातारा : ‘तुम्ही राजकारणात आला नसता तर नेमके काय बनला असता?’ असा धाडसी प्रश्न एका चिमुकल्यानं विचारताच ज्येष्ठ नेते शरद पवार दिलखुलास हसले. आजूबाजूला असलेल्या डझनभर लोकप्रतिनिधींना त्यांनी हाच प्रश्न मोठ्या कौतुकानं पुन्हा एकदा ऐकविला. विशेष म्हणजे हा सारा प्रकार पाहताना उपस्थित लोकप्रतिनिधी अवाक् बनले.बालदिनाचं औचित्य साधून ‘लोकमत’च्या विशेष पानासाठी सोमवारी साताºयातील बाळगोपाळांच्या एका टीमची थेट शरद पवारांसोबत खास मुलाखत रंगली. सांसदीय कार्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साताºयात शरद पवार यांचा सर्वपक्षीय गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी उपस्थित होते. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री सुनील तटकरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार नरेंद्रपाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी शरद पवारांशी चर्चा करीत होते.अगोदरच नियोजन झाल्याप्रमाणे पाच शाळकरी मुलांचा चमू गणवेशातच विश्रामगृहात शिरला. लोकमतच्या विशेष पानावर खास मुलाखत घेण्यासाठी ही चिमुरडी थेट समोर उभी ठाकताच पवारांच्या चेहºयावर कौतुकाश्चर्याचे भाव उमटले. स्वत:हून उठून उभारत त्यांनी मुलांची विचारपूस सुरू केली. ‘लोकमत बालदिनाच्या विशेष पानात नेमकं काय-काय असणार?’ असा सवालही त्यांनी या मुलांना केला.यानंतर मुलांनी हातात वही-पेन घेऊन प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. डझनभर लोकप्रतिनिधींसमोर वेगवेगळे प्रश्न विचारणाºया या चिमुकल्यांचे धाडस पाहून सारेच अवाक् झाले. ‘तुम्ही राजकारणात एवढे मोठे होणार, हे तुम्हाला बालपणी वाटले होते काय?’ या प्रश्नावर पवारांनी हसून ‘नाही’ असे उत्तर दिले. एका चिमुकलीनं ‘सुप्रियातार्इंसारखंच आम्हालाही राजकारणात यायचं असेल तर काय करायला हवं?’ असा प्रश्न विचारताच पवारांनी भुवया उंचावल्या. ‘आत्मविश्वास बाळगा. वक्तृत्व कलेचा अभ्यास करा,’ असं सांगून त्यांनी मोठ्या उत्सुकतेनं ‘हंऽऽ आता पुढचा प्रश्न?’ असं विचारत मुलांच्या उत्सुकतेचं समाधान केलं.पवारांशी संवाद साधणाºया टीममध्ये अण्णासाहेब कल्याणी माध्यमिक विद्यालयातील मानसी बागल, न्यू इंग्लिश स्कूलची जुई साळुंखे, कन्या शाळेतील श्रेया बल्लाळ, देवश्री दामले, पॅरेंटस् स्कूलचा इशांत शिंदे आणि शाहू अ‍ॅकॅडमीमधील इशान वाळिंबे यांचा समावेश होता.राजकारणात आला नसता तर काय बनला असता ?एका चिमुरड्यानं गुगली प्रश्न टाकला की, ‘तुम्ही राजकारणात आला नसता तर नेमके काय बनला असता?’ ...या प्रश्नावर शरद पवार दिलखुलास हसले. त्यांनी हाच प्रश्न मोठ्या आवाजात समोरच्या सर्व लोकप्रतिनिधींना स्वत:च्या तोंडून ऐकविला. विश्रामगृहाचा हॉल हास्यकल्लोळात बुडाला. मात्र, कोणत्या प्रश्नाला उत्तर द्यायचे अन् कोणता प्रश्न टाळायचा, ही पवारांची खासियत मुलांना माहीतच नसावी. प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा करत मुलं जागेवरच उभारली. तेव्हा ‘छोटी असूनही तुम्ही मुलं मला सोडायला तयार नाही की... पत्रकार ते पत्रकारच!’ या अर्विभावात हसत-हसतच पवारांनी मुलाखत संपविली. त्यांच्या पाठीवर हात टाकत त्यांच्या धाडसी पत्रकारितेचं कौतुकही केलं. ‘लोकमत बालदिन’ पानाला शुभेच्छाही दिल्या.

टॅग्स :Politicsराजकारण