शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खटला निकाली काढण्याचे निर्देश

By admin | Updated: September 20, 2016 00:09 IST

कृष्णा निवडणूक खटला सहा महिन्यांत संपवा : एन. डी. पाटील यांची माहिती

कऱ्हाड : ‘कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालाला आव्हान देत संस्थापक पॅनेलचे विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या वतीने सातारा येथील सहकार न्यायालयात सुरू असलेला खटला येत्या सहा महिन्यांत निकाली काढावा, असे निर्देश पुणे येथील वरिष्ठ न्यायालयाने दिले आहेत. कारखान्याच्या निवडणूक निकालास आव्हान देणारा खटला चालविण्याचे अधिकार सातारा येथील सहकार न्यायालयास नसल्याचा मुद्दा उपस्थित करत डॉ. सुरेश भोसले यांनी याबाबत वरिष्ठ न्यायालयात दाखल केलेली याचिका निकाली काढताना वरिष्ठ न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत,’ अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी सहकारमंत्री डॉ. एन. डी. पाटील यांनी दिली.यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व संस्थापक पॅनेलचे विद्यमान संचालक अविनाश मोहिते, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील-शेरेकर, अ‍ॅड. रवींद्र पवार, कृषिमित्र अशोकराव थोरात, सयाजीराव मोरे, कारखान्याचे विद्यमान संचालक अशोकराव जगताप यांच्यासह संस्थापक पॅनेलचे समर्थक, कार्यकर्ते उपस्थित होते.डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, ‘कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक मतमोजणीत अनेक गैरप्रकार झाले आहेत. मतदानापेक्षा जादा मतपत्रिका छापून घेण्यात आल्या होत्या तसेच ५३९ मतदारांच्या मतपत्रिका गायब आहेत. त्यांनी मतदान केल्याची नोंद मतदान केंद्रावर झाली होती, मात्र त्यांच्या मतपत्रिका मतमोजणीत आढळून आलेल्या नाहीत. मतदारांनी नोंद करून मतपत्रिका घेतल्या. मात्र, त्या मतपेटीत टाकण्याऐवजी घरी नेल्या. हे निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे सबळ ठरत नाही. मतपत्रिका काही मतदारांनी घरी नेल्या आणि काहींनी जादा मतपत्रिका आणून मतपेटीत टाकल्या, हे असे कसे होऊ शकते? याची शहानिशा झाली पाहिजे. संस्थापक पॅनेलचे काले मतदार संघातील काही उमेदवार अवघ्या ३२ मतांनी पराभूत झाले आहेत. त्यांना मतदान व मतमोजणी प्रक्रियेतील गैरप्रकाराचा फटका बसला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संस्थापक पॅनेलने या मतमोजणी निकालास सातारा येथील सहकार न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र सातारा येथील सहकार न्यायालयास हा खटला चालविण्याचा अधिकार नाही, असे कारण पुढे करत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी याबाबत पुणे येथील वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या वर्षभरापासून हा दावा सातारा येथील सहकार न्यायालयात सुरू होता. मात्र, गेल्या महिन्यात सातारा येथील न्यायालयाने डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांचा दावा चालविण्याचा या न्यायालयास अधिकार नसल्याचा अर्ज फेटाळला होता. या अर्जावर डॉ. भोसले व त्यांचे सहकारी वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यास गेले होते. संबंधित दावा लांबविण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र वरिष्ठ न्यायालयाने ही याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याचा आधार घेत याबाबतचा दावा सातारा येथील सहकार न्यायालयातच चालविला जावा व जास्तीत जास्त येत्या सहा महिन्यांच्या आत निकाली काढावा, असे निर्देश सहकार न्यायालयास दिले आहेत. वरिष्ठ न्यायालयाकडून देण्यात आलेल्या या आदेशाचे पालन न्याय व्यवस्थेकडून निश्चितपणे होईल, तसेच दिलेल्या मुदतीतच खटल्याचा निकाल लागेल, असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. उशिरा मिळणारा न्याय हा न्याय नाकारण्याचाच एक भाग असतो,’ असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. (प्रतिनिधी)++न्यायदेवतेकडून आम्हाला नक्कीच न्याय मिळेल : पवारअ‍ॅड. रवींद्र पवार म्हणाले, ‘कारखान्याचे विद्यमान सत्ताधारी व निवडणूक यंत्रणा यांच्यात मिलीभगत असावी, अन्यथा विद्यमान सत्ताधाऱ्यांनी या खटल्याची सुनावणी लांबणीवर जावी, यासाठी न्यायालयात प्रयत्न केले नसते. मतदानापेक्षा जादा मतपत्रिका छापण्यात आल्या होत्या, त्याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत. तसेच मतमोजणीसाठी प्रशिक्षण न देता अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती, मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकारी किशोर पवार यांना बदलून त्यांच्या जागी संजीव देशमुख यांची नेमणूक करण्यात आली होती हे सर्व संशयास्पद असून, मतमोजणीही सदोष झाली आहे, मतदान आणि मतपत्रिकेत मोठा गोलमाल झाला आहे. कारखान्याच्या इतिहासात आजवर झालेल्या निवडणुकांमध्ये कधीही बाद झाली नाहीत, एवढी ७ हजार ५०० मते या निवडणुकीत बाद करण्यात आली आहेत. त्यामुळेच मतदान व मतपत्रिकेत गैरप्रकार झाल्याचे समोर येत आहे. याबाबत न्यायदेवतेकडून आम्हाला नक्कीच न्याय मिळेल,’ असेही अ‍ॅड. पवार यांनी सांगितले.