शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

कारखान्यांच्या ऊसबिलाचा हप्ता ऐरणीवर

By admin | Updated: June 15, 2014 00:15 IST

सगळेच विक्रमी तर दर नीचांकी का : इंद्रजित मोहिते

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे प्रशासन कारखाना अद्ययावत व पूर्ण क्षमतेने चालला असल्याचा डांगोरा पिटत आहे. विक्रमी गळीत, विक्रमी कार्यक्षमतेचा वापर असे फलकही ठिकठिकाणी झळकत आहेत. जर सगळेच विक्रमी तर नीचांकी दर का? असा सवाल करीत दुसरा हप्ता ७०० रुपयांनी द्यावा, अशी मागणी माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केली. डॉ. मोहिते म्हणाले, ‘विद्यमान प्रशासनाला भूतकाळाचे विस्मरण झाल्याचे दिसते. कारण हा कारखाना मागील चार अध्यक्षांनी मोठ्या प्रयासाने विस्तारला. कारखान्याचा, सभासदांचा आर्थिक पाया भक्कम केला; परंतु दुसऱ्यांच्या कष्टाची कीर्ती स्वत:च्याच शिरपेचात खोवताना विद्यमान प्रशासन पुन्हा वरकरणी सभासदांची दिशाभूल करीत आहे. चालूवर्षीच्या गळीत हंगामाच्या सुरुवातीला साखरेचा दर हा प्रतिक्विंटल दोन हजार ४५० असताना ‘कृष्णा’ने ‘एफआरपी’प्रमाणे प्रतिटन दोन हजार २२१ रुपये दर जाहीर केला होता. आज बाजारपेठेतील साखरेची किंमत दोन हजार ९०० च्या घरात असताना मालाच्या विक्रीतून ५०० रुपयांहून अधिक निघणारा दर सभासदांना मिळायला पाहिजे. कारखाना जर शंभर टक्के कार्यक्षमतेने चालला असेल तर उपपदार्थ निर्मितीसुद्धा शंभर टक्क्यांनी चालली पाहिजे, असे असल्यास डिस्टीलरी को-जनरेशन, मिथेन गॅस, इथेनॉल, कंट्रीलिकर, कंपोस्ट, बियाणे प्लॉट, पेट्रोल पंप आदींच्या व्यवहारातून कर्जाचे हप्ते फेडूनही सुमारे पाचशे पंच्चावन्न रुपये प्रती मेट्रिक टनास उरले पाहिजेत व ते मिळणे आवश्यक होते. केंद्र आणि राज्य शासन यांनी अडचणीच्या काळात कारखानदारीला दिलेल्या सवलती म्हणजेच लेव्ही साखरेची वाढीव किंमत, परचेस टॅक्स माफी, एक्साईज टॅक्स डिफरमेंट व निर्यात अनुदानातून प्रति मेट्रिक टनास सातशे रुपयांची जी उपलब्धी झाली आहे. तीही मिळणे आवश्यक होते. याचा उल्लेख प्रशासन कोठेच करीत नाही. (प्रतिनिधी)दुसराच काय तिसरा हप्ताही देऊ : अविनाश मोहितेकऱ्हाड : ‘संस्थापक पॅनेलने गत चार वर्षांत कृष्णा कारखाना अत्यंत कार्यक्षमतेने चालविला आहे. यंदा गेटकेनचे टिपरेही आणलेले नाही. २०११-१२ मध्ये महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाचा ऊसदर दिला. गतवर्षी शेजारच्या कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला आहे. यंदा पहिला हप्ता दिला आहे. दुसरा हप्ताही योग्य वेळी दिला जाईल. साखरेचे दर वाढले तर तिसरा हप्ताही देऊ, माजी अध्यक्षांनी जरा धीर धरावा,’ असे उत्तर यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. पत्रकात म्हटले आहे की, कृष्णा कारखाना मागील चार अध्यक्षांनी प्रयासांनी विस्तारला, असे डॉ. मोहिते सांगतात. पण, त्यांचा तो मोठा गैरसमज आहे. कारखान्याची उभारणी सर्वसामान्य सभासद आणि शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने केली आहे. कारखान्याच्या विस्तारवाढीत आणि आधुनिकीकरणात सभासदांचा विश्वास, योगदान मोलाचे आहे. हा विश्वास व योगदान सार्थ ठरविले ते लोकांना कळावे म्हणूनच पोस्टर्स लावली आहेत. कारखान्याच्या पैशाने पॅरिसला जाऊन आलेली पोस्टर्स लावण्यापेक्षा हे कधीही चांगले आहे. डॉ. मोहिते यांनी दुसऱ्या हप्त्याचा प्रश्न उपस्थित केला असला तरी सभासदांना हा हप्ता मिळणार असल्याची खात्री आहे. संपलेल्या गळीत हंगामात साखरेचे दर अत्यंत कमी होते. त्यामुळे ‘एफआरपी’प्रमाणे दर देणेही जिकिरीचे बनले होते. काही कारखान्यांनी तर ही रक्कम दोन हप्त्यात देऊ केली. कृष्णाने मात्र एकरकमी दिली. कारखान्याची १२ लाख पोती साखर गोडावूनमध्ये पडून आहेत. साखरेला दर अन् उठाव नाही तरीही कारखाना दुसरा हप्ता देणार आहे. दर वाढले तर तिसरा हप्ता देण्यातही कुचराई करणार नाही. मात्र जाहीर करूनही बिल न देणाऱ्यांपैकी आम्ही नाही,’ असा टोला त्यांनी विरोधकांना दिला. कृष्णा कारखाना कार्यक्षमतेत आणि दरात कुठेच मागे नाही असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)