कोपर्डे हवेली : कऱ्हाड उत्तर पूर्व विभागात सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिरायती भागात कऱ्हाड उत्तर पूर्व विभागात जिरायती क्षेत्रावर सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने उत्पादन घटणार, असा अंदाज शेतकऱ्यांकडून बांधला जात असतानाच गेल्या चार-पाच दिवसांपासून किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
काही शेतकऱ्यांचे सोयाबीन पंधरा ते वीस दिवसांत काढणीयोग्य होईल. परंतु, अचानक सोयाबीन पिकाची पाने करपू लागली आहेत. काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर कीडअळी झाली आहे. ज्यांच्या सोयाबीनचा पेरा उशिरा झाला आहे, त्यांच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसत आहे.
चौकट
सोयाबीन पीक पेरणी झाल्यानंतर नवद्द ते शंभर दिवसांत ते काढणीस येते. सोयाबीन काढून रब्बीतील शाळवाचे पीक घेतले जाते. सोयाबीनला गेल्यावर्षी चांगला दर मिळाल्याने यावर्षीही चांगला दर मिळेल, यासाठी अनेकांनी उत्पादन खर्च जास्त केला आहे.
फोटो ०६ कोपर्डे हवेली
कऱ्हाड उत्तर पूर्व विभागात सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. (छाया : शंकर पोळ)