शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तासवडे स्फोटातील जखमी कामगाराचा मृत्य

By admin | Updated: January 28, 2015 00:58 IST

मृतांची संख्या तीनवर : कंपनी मालकाच्या वडिलांवर उपचार सुरूचू

कऱ्हाड : तासवडे औद्योगिक वसाहतीत दि. १८ रोजी स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या अनिल शांताराम कणसे (वय २१, रा. सैदापूर-कऱ्हाड) या कामगाराचा सोमवारी रात्री उपचारांदरम्यान मृत्यू झाला. स्फोटातील मृतांची संख्या तीन झाली असून, कंपनीमालकाचे वडील प्रभाकर कुंभार यांच्यावर अद्यापही सांगली येथे उपचार सुरू आहेत. पाटणमधील डॉ. किशोर कुंभार याची तासवडे औद्योगिक वसाहतीत डोंगरपायथ्याला ‘मिआॅसिस केमिकल’ नावाची कंपनी आहे. या कंपनीत १८ जानेवारी रोजी सायंकाळी भीषण स्फोट झाला होता. स्फोटात विश्वजित बबन कुंभार (वय २६, रा. तळबीड, ता. कऱ्हाड), अजित देसाई (२५, रा. सैदापूर, ता. कऱ्हाड) या दोन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या उडून आग लागली व त्यातूनच हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप स्फोटाचे ठोस कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून त्याबाबत कसून तपास केला जात आहे. स्फोटाच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कंपनीतील इतर कामगारांचे जबाब नोंदवले होते. स्फोट झाला तेव्हा कंपनीच्या तळमजल्यात ‘ट्युलीन’ नावाच्या रसायनाचे दोन ड्रम होते. तसेच पॅरानॅट्रो फिनेल पावडरच्या ५० किलोच्या १० बॅग होत्या. या दोन्ही वस्तू ज्वलनशील आहेत. सुरूवातीला अचानक धूर येऊन नंतर स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. कंपनीमालक डॉ. कुंभार हे संशोधक असून, औषधांसाठी लागणारा कच्चा माल तयार करण्याचे काम कंपनीत केले जाणार होते. स्फोटावेळी कच्च्या मालाचे मिश्रण करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती जबाबांतून निष्पन्न झाली आहे. मिश्रणावेळी तापमान वाढल्याने स्फोट झाला की शॉर्टसर्किटमुळे याचा तपास केला जात आहे. (प्रतिनिधी)