शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

कंटेनरखाली अडकलेला जखमी अखेर सुखरूप !

By admin | Updated: October 10, 2014 23:03 IST

काळजाचा ठोका चुकला..चालकाचे प्रसंगावधान..

सातारा : कंटेनरचा टायर अचानक फुटल्याने कंटेनर कारवर पडला. कारमध्ये अडकलेल्या चालकाला तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर नागरिक व पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. हा अपघात गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास झाला.किरण गवळी (वय ३९), एकनाथ थोरात (दोघेही रा. कोडोली, ता. सातारा) अशी जखमींची नावे आहेत. हे दोघे कारमधून रात्री घरी जात होते. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अंजठा चौकात कार पोहोचली. याचवेळी शिवराज पेट्रोलपंपाकडून आलेला कंटेनर अचानक कारवर पडला. हा भीषण अपघात घडल्याची माहिती जस-जसी नागरिकांना मिळू लागली, तसे नागरिक घटनास्थळी येऊ लागले. पोलीस आणि रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या. केवळ कारचा मागचा भाग दिसत होता. संपूर्ण कार कंटेनरखाली चिरडली गेली होती. पोलिसांनी आणि नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारच्या पाठीमागची काच फोडली. त्यानंतर पहिल्यांदा एकनाथ थोरात यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांच्या हाताला आणि तोंडावर जखमा झाल्या होत्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चालक किरण गवळी हे कारमध्येच अडकले होते. आतून ते हाताने पत्रा वाजवून आवाज देत होते. भला मोठा कंटेनर त्यांच्या कारवर कोसळल्याने घटनास्थळीचे चित्र विदारक दिसत होते. कंटेनर उचलण्यासाठी दोन क्रेन मागविण्यात आल्या. तोपर्यंत गवळी आतमध्ये अडकून पडले होते. अखेर दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर किरण गवळी यांना चक्काचूर झालेल्या कारमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. (प्रतिनिधी)काळजाचा ठोका चुकला..दोन क्रेनच्या साह्याने कंटेनर वर उचलण्याचा प्रयत्न सुरू होता. याचवेळी एका क्रेनची तार अचानक तुटली आणि थोडाफार वर उचललेला कंटेनर पुन्हा कारवर जोरदार आदळला. यावेळी तेथे उपस्थितांच्या काळाजाचा ठोका चुकला. कंटेनरमध्ये नव्या कोऱ्या नऊ गाड्या होत्या. त्यामुळे कंटेनरचे वजन आणखीनच जास्त होते. पुन्हा एकदा क्रेनने कंटेनर वर उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता गवळी यांचे हात धरून त्यांना ओडतच नागरिक व पोलिसांनी बाहेर काढले. गवळी सुखरूप असल्याचे पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आले. दैव बलवत्तर म्हणूनच त्यांचा जीव वाचला. चालकाचे प्रसंगावधान..कंटेनर पडल्यानंतर गवळी यांनी तत्काळ सीट पाठीमागे घेतली. कारचे स्टिअरिंग मांडीवर रुतले होते. अशा परिस्थितीतही त्यांनी संयम सोडला नाही. जखमी एकनाथ थोरात यांना एका हाताने त्यांनी पाठीमागच्या शीटवर ढकलले. त्यामुळे थोरात यांचा जीव वाचला.