शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

सूचनांना हो हो.. काम मात्र शून्य

By admin | Updated: April 30, 2016 00:58 IST

कऱ्हाड : अधिकारी आक्रमक; पाणीपुरवठा विभागावर ताशेरे; जलसंधारणाची कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश--पंचायत समिती मासिक सभा

कऱ्हाड : पावसाळा सुरू होण्यास अजूनही किमान दीड महिन्याचा अवधी बाकी आहे. विशेषत: तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाईची भीषण अवस्था आहे. तुम्ही आमच्या सूचनांना केवळ हो हो म्हणता, प्रत्यक्षात काम मात्र शून्य असते. या शब्दांत सभापती देवराज पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी देवराज पाटील होते. गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते. पाणीपुरवठा विभागाच्या आढाव्यावेळी सभापती पाटील यांनी जलयुक्त शिवार अंतर्गत तालुक्यातील जलसंधारणाची कामे त्वरित पूर्ण करण्याची सूचना केली. जलयुक्त शिवार योजना केवळ माण-खटाव तालुक्यासाठी नाही हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे. योजनेत समाविष्ट १३ गावांमध्ये जून महिना सुरू होण्यापूर्वी कामे पूर्ण करावीत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता महेश आरळेकर यांनी जिल्हा परिषदेकडे बोअरवेलसाठी पाठवलेले ३९ पैकी २३ प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगितले. यावेळी ज्या गावांमध्ये खोदलेल्या बोअरवेलना पाणी लागले नाही. त्याठिकाणी पुन्हा भूजल सर्वेक्षण करून नवीन बोअरवेल खोदण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. रूपाली यादव यांनी बोअरवेल मारताना अगोदर त्याठिकाणी योग्य प्रकारे भूजल सर्वेक्षण करावे. विनाकारण शासनाचा निधी वाया घालवू नये, अशी मागणी केली.भाग्यश्री पाटील यांनी आरफळ कॅनॉलला ५ मे पर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी उपस्थित इतर सदस्यांनी सांगितले की, आरफळ कॅनॉल परिसरातील विहिरींचे जलस्त्रोत टिकून राहावे यासाठी तरी पाणी सोडण्याची गरज आहे. गरज नसतानाही सलग ६२ दिवस आरफळ कॅनॉलला पाणी सोडण्यात येत होते. आता गरज असताना मात्र कॅनॉल कोरडा खडखडीत पडला आहे. माण-खटाव किंवा सांगली जिल्ह्याला पाणी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र नेहमीच टंचाईग्रस्त बनून राहिलेल्या मसूरच्या पूर्व भागालाही पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारी आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच पाटबंधारे विभागालाही ठराव दिला पाहिजे. प्रसंगी यासाठी मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा करण्याची गरज आहे.शेरे-शेणोली परिसरात तीन महिन्यांपूर्वी विजेच्या अतिरिक्त दबावामुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे वीज कंपनीकडून अजूनही केला नसल्याबद्दल अनिता निकम यांनी नाराजी व्यक्त केली. ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी बजेटचे कारण आणखी किती दिवस सांगणार? या शब्दांत सभापतींनी आपली नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)पाणी आहे; पण वीज नाही!घोलपवाडी येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी उपलब्ध झाले आहे. परंतु वीज कनेक्शनअभावी त्या पाण्याचा उपयोग ग्रामस्थांना करता येत नाही. पावसाळा सुरू होईपर्यंत संबंधित विहिरींचे अधिग्रहण करू देण्यासही संबंधित शेतकरी तयार आहेत. त्यामुळे या विहिरींचे पाणी उपलब्ध झाल्यास गावासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार नाही. तातडीने वीज कनेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना गटविकास अधिकाऱ्यांनी दिली.