शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आईचं दूध पिताना ठसका लागून चिमुकलीचा मृत्यू, सातारा जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

By दत्ता यादव | Updated: December 27, 2022 15:53 IST

सातारा : आई अंगावरील दूध पाजत असताना श्वसन नलिकेत दूध अडकून अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कऱ्हाड तालुक्यातील कवठे येथे ...

सातारा : आई अंगावरील दूध पाजत असताना श्वसन नलिकेत दूध अडकून अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कऱ्हाड तालुक्यातील कवठे येथे घडली.याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वाती कृष्णत यादव (रा. कवठे, ता. कऱ्हाड) यांनी अडीच महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला. रात्री नेहमीप्रमाणे मुलीला त्या अंगावरील दूध पाजत होत्या. त्यावेळी मुलीच्या श्वसन नलिकेत दूध गेल्याने तिला ठसका लागला. यातच तिला उलटी झाल्याने ती बेशुद्ध पडली. अडीच महिन्यांच्या चिमुकलीला घरातल्यांनी तातडीने कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मुलीचं बारसंही घातलं नव्हतं. चिमुकलीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने यादव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची उंब्रज पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, पोलिस नाईक वैभव डोंगरे हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, सातारा शहरामध्ये सोमवारी एक वर्षाच्या मुलीचा घशात चॉकलेट अडकून मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर