शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२१४ ठिकाणी ‘मापात पाप’ वजन मापे विभाग : जिल्ह्यात फेबु्रवारीअखेर ८८ लाख ६१ हजार २६५ रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:26 IST

सातारा : मापात पाप करून वस्तूंची विक्री करणाऱ्या २१४ व्यावसायिकांवर चालू आर्थिक वर्षात खटले दाखल करण्यात आले आहेत. वजनी मापे कायद्यानुसार १५५ तर पॅकेजड फूड कायद्यांतर्गत

ठळक मुद्देVajan kata

सागर गुजर ।सातारा : मापात पाप करून वस्तूंची विक्री करणाऱ्या २१४ व्यावसायिकांवर चालू आर्थिक वर्षात खटले दाखल करण्यात आले आहेत. वजनी मापे कायद्यानुसार १५५ तर पॅकेजड फूड कायद्यांतर्गत ५९ खटले दाखल केले असून, ८८ लाख ६१ हजार २६५ रुपयांचे पडताळणी मुद्रांक शुल्क वसूल करण्यात आले आहे.

सातारा येथील वजन काटे कार्यालयाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. वजन करून वस्तूंची विक्री करणाºया व्यावसायिकांनी दरवर्षी आपल्याकडील वजनी काटे छापून घेणे आवश्यक असते. वजन काटे विभाग दरवर्षी कॅम्प लावून वजनी काटे तपासून देतात. या कार्यालयाकडे असणाºया वजनांशी ताळमेळ लावून वजन काटे तपासून दिले जातात. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक काट्यांचा वापर सुरू झाला असला तरी दुर्गम भागात अजूनही जुन्या पद्धतीचे वजन, काटे, तराजू वापरले जातात. अनेकदा अशा वस्तू छापून घेत अधिकृत करून घेतल्या जात नाहीत. वजन छापून न घेणाºया दुकानदारांवर धाडी टाकून कारवाईचे सत्र नेमके फेब्रुवारी, मार्च महिन्यात सुरू होते. मार्च २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत वजन काटे विभागाने ४५९ खटले दाखल केले. संबंधित व्यावसायिकांकडून ९३ लाख ९९ हजार ४५७ रुपयांचे पडताळणी व मुद्रांक शुल्क वसूल करण्यात आले. पॅकेजड कम्युडिज कायद्यांतर्गत १२७ खटले दाखल केले. या अंतर्गत १९ लाख १९ हजार ५० रुपयांची वसुली खात्यामार्फत तडजोडीने मिटविलेल्या प्रकरणांत करण्यात आली.दरम्यान, चालू वर्षात पडताळणी मुद्रांक शुल्क ८८ लाख ६१ हजार २६५ रुपये तर पॅकेजड कायद्यांतर्गत ५९ खटले दाखल करुन ९ लाख २० हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला.काय केला जातो झोल?तराजूचे कान हातोड्याने ठोकतातवजनांतील शिसे काढले जातेवजन ग्रार्इंडरवर घासले जातेरॉकेलच्या भांड्यात कातडी पट्टा टाकला जातोतराजूचा काटा विशिष्ट पद्धतीने लावला जातो 

वस्तू घेताना योग्य वजनात मिळते का? याची खात्री ग्राहकांनी केली पाहिजे. दुकानदारांकडील वजनाबाबत शंका आल्यास त्याची तक्रार न भीता वजन काटे कार्यालयाकडे करावी, संबंधित दुकानदारांवर कारवाई केली जाईल. ग्राहक जागृती सप्ताहातही आम्ही याबाबत जनजागृती केली आहे.- राजेंद्र गायकवाड, सहायक नियंत्रक,वजन व काटे कार्यालय