शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू सेवनाने वाढवले हृदयाचे दुखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:27 IST

जागतिक तंबाखू विरोधी दिन प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग होण्याची भीती ...

जागतिक तंबाखू विरोधी दिन

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग होण्याची भीती होती. मात्र, गेल्या काही वर्षांत तंबाखूच्या व्यसनाने हृदयाचे दुखणे वाढवले आहे. हृदयविकाराच्या झटक्याबरोबरच हार्ट स्ट्रोकचा धोका वाढल्याने तंबाखू सेवन आता अधिक जीवघेणं ठरू लागलं आहे. या व्यसनापायी देशभरात वर्षाला दहा लाखांहून अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात १० कोटींहून अधिक नागरिक विविध माध्यमातून तंबाखूचे सेवन करतात. यामध्ये २५ टक्के पुरुष तर १५ टक्के महिलांचा समावेश आहे. यापैकी १० लाख रुग्णांना तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने प्राण गमवावे लागतात. यामध्ये हृदयासंबंधी विकार, स्ट्रोक आणि कर्करोगाचा समावेश आहे. तंबाखूच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा तसेच हार्ट स्ट्रोकचा धोका दुप्पटीने वाढतो तर धुम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका हा २५ टक्क्यांनी अधिक वाढतो.

तंबाखूमध्ये अल्कोहोलाईड रसायनात कोटीनाईन, अ‍ॅन्टबीन, अ‍ॅनाबेसीन अशी रसायने आढळतात. भारतीय तंबाखूमध्ये मक्युर्री, लेड, क्रोमियम, कॅडमियम आदी अतिविषारी रसायने सापडतात. या व्यतिरिक्त तंबाखूच्या धुरात व धुम्रपानात डीडीटी, बुटेन, सायनाईड, अमोनिया आदी रसायने आढळतात, ही रसायने शरिरासाठी अपायकारक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

चौकट :

निकोटीनचा परिणाम मेंदूवरही

तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होतो. तंबाखूच्या सेवनाने त्यातील निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्य थांबते. मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते. तसेच जे लोक धूम्रपान करतात, त्यांना हृदयघात होण्याची शक्यता अधिक असते.

रक्तदाब वाढण्याचाही धोका

तंबाखूमुळेच तोंड, जीभ, घसा, अन्ननलिका, आतडी व इतरही अवयवांचे कर्करोग होतात. त्याशिवाय हृदयावर होणारा तंबाखूचा परिणामही तितकाच घातक आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे शरिरातील वेगवेगळ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळेच हृदयरोग, हृदयरोगाचा झटका, पक्षाघात होऊ शकतो. हाता-पायांच्या रक्तवाहिन्याही ब्लॉक होऊन निरनिराळ्या समस्या उद्भवतात. तंबाखूजन्य पदार्थांमुळेच रक्तदाब वाढतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल) वाढते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) घटते.

कोट :

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने कर्करोग होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांच्या तुलनेत पुरूषांची संख्या मोठी आहे. प्राथमिक अवस्थेत निदान न झाल्याने कर्करूग्णांना उपचार देणं मुश्कील होतंय, त्यामुळे त्यांच्या मृत्यूचा आकडा मोठा दिसतोय.

- डॉ. धीरज खडकबाण, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट

पॉईंटर ...

तंबाखू सोडण्यासाठी करा हे उपाय?

१. सर्वात आधी व्यसन सोडण्यामागचे कारण लक्षात घ्या. उदा. कर्करोग, हृदयविकार, फुफ्फुसाचा आजार

२. तंबाखू सोडण्याची तारीख ठरवा.

३. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीचा आधार घ्या.

४. समुपदेशनाचा आधार घ्या.

५. कुटंब व मित्रपरिवाराची मदत तसेच आधार घ्या. त्यांच्यासोबत चांगला वेळ व्यतीत करा.

६. ताणतणाव टाळा, अल्कोहोलचे सेवन टाळा, तलफ लागल्यास दुसरीकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करा.

७. अधूनमधून व्यसन केले तर चालेल, आठवड्यातून एकदा व्यसन करण्यास हरकत नाही, अशा गैरसमजूतींपासून दूरच राहा. जेणेकरून पुन्हा व्यसनांच्या आहारी जाल.

८. ध्यानधारणा, योगसाधना करा.

९. स्वत:चा आत्मविश्वास वाढवा आणि तंबाखू सोडण्याचे कित्येक फायदे आहेत, हे देखील स्वत:च्या मनाला पटवून द्या.

१०. प्रयत्न करा. हरलात तर स्वत:ला दोष न देता पुन्हा नव्या उमेदीने व्यसनमुक्तीच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचला.

\\\\\\\\