कास तलावातील पाणीसाठ्यात तीन इंचाने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:40 AM2021-05-09T04:40:18+5:302021-05-09T04:40:18+5:30

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तीन इंचाने वाढ झाली आहे. सद्यस्थितीला ...

An increase of three inches for water in Kas Lake | कास तलावातील पाणीसाठ्यात तीन इंचाने वाढ

कास तलावातील पाणीसाठ्यात तीन इंचाने वाढ

googlenewsNext

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तीन इंचाने वाढ झाली आहे. सद्यस्थितीला कास तलावात नऊ फूट तीन इंच पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.

सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होऊन मागील आठवड्यात कास तलावात केवळ नऊ फूट पाणीसाठा शिल्लक राहिला होता. कास तलावाचा दुसरा व्हॉल्व्ह बंद करून सातारा शहराला अंतिम तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या एक-दोन पावसानेे जमिनीत ओलावा निर्माण झाला होता. गुरुवारी तासभर पडलेल्या मुसळधार पावसाने तलावाच्या पाणीपातळीत शुक्रवारी रात्री तीन इंचाने वाढ होण्यास मदत झाली आहे.

तलावातील पाणीपातळी खालावल्याने ठिकठिकाणी तलावात जमिनी उघड्या पडल्याचे चित्र दिसत आहे. सद्यस्थितीला गतवर्षीपेक्षा सात इंच पाणीसाठा कमी शिल्लक असल्याने सातारकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे.

०८कास तलाव

सातारा तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे कास तलावात तीन इंच पाणीसाठा वाढला आहे.

(छाया -सागर चव्हाण)

Web Title: An increase of three inches for water in Kas Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.