शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 12:21 IST

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर करडी नजर ठेवली असून, कोणीही आक्षेपार्ह कमेंट्स करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढव्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोलिसांची करडी नजर

सातारा : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर करडी नजर ठेवली असून, कोणीही आक्षेपार्ह कमेंट्स करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.येत्या काही दिवसांत सर्वोच्च्य न्यायालयाकडून रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिदचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. ग्रुप अ‍ॅडमीन म्हणून असणाऱ्यांना सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ क्लिप व्हायरल करू नये, एखाद्याने आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ क्लिप पाठवली तर ती दुसºयाच्या मोबाईलवर फॉरवर्ड करू नये, जागेवरच ब्लॉक करावे तसेच संबंधिताचे नाव पोलिसांना तत्काळ कळवावे, काही अनुचित प्रकार घडल्यास ग्रुप अ‍ॅडमीन कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहाणार आहे, असेही पोलिसांनी सांगितले.दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून काही ग्रुप अ‍ॅडमीनना १४९ सीआरपीसी प्रमाणे नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू असून, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि धार्मिक संघटनेशी जोडलेल्या कार्यकर्त्यांसोबत पोलीस वारंवार बैठका घेत आहेत. निकाल लागल्यानंतर रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSatara areaसातारा परिसर