शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांची चिंता वाढली; कोरोनाबाधितांचा आकडा शतकाजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 13:57 IST

प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत, तरीसुद्धा लोक ते नियम पाळताना पाहायला मिळत नाहीत.

सातारा : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज, मंगळवारी शंभराच्याजवळ जाऊन पोहोचला. २ हजार ८३८ तपासण्यांमधून तब्बल ९८ बाधित आढळून आले आहेत. रुग्ण वाढीचा दर ३.४५ टक्के इतका वाढला असून जिल्ह्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सरत्या वर्षाला निरोप देत असताना ३१ डिसेंबर पासूनच रुग्ण वाढीला सुरुवात झाली. वर्षाअखेरीस ४८ रुग्ण बाधित आढळले होते. १ जानेवारीला - ५३, २ जानेवारीला - ६५, ३ जानेवारीला - ६३ तर आता ४ जानेवारीला - ९८ इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढले आहेत.नवीन वर्षामध्ये रुग्ण संख्या वाढू लागली आहे. कोरोना चाचण्या करण्यावर भर दिला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत तरीसुद्धा लोक ते नियम पाळताना पाहायला मिळत नाहीत. लग्नसोहळे राजकीय कार्यक्रमांना प्रचंड मोठी गर्दी उसळताना पाहायला मिळते. अंत्यविधीसाठी देखील लोक गर्दी करतात. अनेक जण बाजारपेठेमध्ये फिरत असताना तसेच एकमेकांशी गप्पा गोष्टी करत असताना हॉटेलमध्ये एकत्र आल्यानंतर मास्कचा वापर करत नाहीत असे दिसते. या रुग्ण वाढीमुळे भविष्यामध्ये परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे.रुग्ण वाढीचा दर असाच वाढत राहिल्यास प्रशासनाला देखील नियंत्रण राखणे शक्य होणार नाही. सध्याच्या घडीला जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. कंत्राटी पद्धतीने घेतलेले आरोग्य कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. कोरोनाची लाट उसळली तर लोकांवर उपचार कसे करायचे, हा प्रश्न निर्माण होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या