पुणे ते शेंद्रे या राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाली आहे. हे निदर्शनास आणून देत खासदार पाटील यांनी त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी मंत्री गडकरी यांच्याकडे केली. तसेच शेंद्रे ते कागल या भागातील राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले सहा पदरीकरणाचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे. याशिवाय कराड येथे कोल्हापूर नाक्यावर तीन पदरी पूल असल्यामुळे आजवर अनेक अपघात झाले आहेत. त्या अपघातामध्ये अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. असे अपघात टाळण्यासाठी कोल्हापूर नाक्यावरील प्रस्तावित सहापदरी उड्डाणपुलाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी महत्त्वाची मागणीदेखील खासदार पाटील यांनी त्यांच्याकडे यावेळी केली.
त्यावर मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते शेंद्रे या रस्त्याची गुणवत्ता वाढविणार असल्याचे व शेंद्रे ते कागल या रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम लवकरच मार्गी लावणार असल्याचे सांगितले. तसेच कोल्हापूर नाका, कराड येथे लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असून, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याचे आश्वासन त्यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना यावेळी दिले.
फोटो -पाठवून देत आहे