शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ढगांच्या गडगडाटात सातारा शहर, फलटणला वळवाने झोडपले

By नितीन काळेल | Updated: April 19, 2023 18:23 IST

एका विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस : आठवड्यात सहावेळा  हजेरी; पाऊण तास बॅटिंग 

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा शहर आणि परिसराला बुधवारी सायंकाळी ५  वाजण्याच्या सुमारास वळवाच्या पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात जवळपास पाऊण तास पाऊस पडत होता. यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले, तर रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. तर मंगळवारी फक्त साताऱ्यात पाऊस झाला नाही. मात्र मागील आठवड्यात सहावेळा वळीवाने हजेरी लावली आहे. पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे.    

फलटण शहर परिसरामध्ये देखील सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडडाटासह पाऊस सुरु झाला. यामुळे परिसरातील वीज गेली होती.

     सातारा जिल्ह्यात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली होती. त्याचबरोबर उकाड्यातही कमालीची वाढ झालेली. त्यातच अधूनमधून ढगाळ वातावरणही तयार व्हायचे. त्यामुळे पावसाळा पोषक वातावरण तयार होत होते. याची सुरुवात मागील गुरुवारपासून झाली. त्यावेळी गुरुवारी जिल्ह्यातील मान,  खटाव, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तर पाटण तालुक्यातच एका ठिकाणी वीज पडण्याची घटना घडली होती. सातारा शहरातही पाऊस झाला होता. आठ दिवसाचा विचार करता सातारा शहरात सहा दिवस पाऊस पडलेला आहे. तर जिल्ह्यात दररोज कोणत्या कोणत्या भागात वळवाचा पाऊस हजेरी लावत आहे. यामध्ये अधिक करून गाराच अधिक पडतात. परिमेय शेती पिकांचे आणि फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ८ एप्रिलपासून आतापर्यंत सुमारे सात कोटी रुपयांचे पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. असे असतानाच पाऊस आणखी पाठ सोडण्यास तयार नाही. बुधवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. तसेच सातारा शहरातही जोरदार हजेरी लावली. 

   सातारा शहर आणि परिसरात बुधवारी  सकाळपासूनच उकाडा तीव्र होता. बारानंतर अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे पाऊस लवकरच पडणार असा अंदाज होता. दुपारी चारच्या सुमारास सातारा शहर आणि परिसरात आभाळ भरून आले. त्याचबरोबर ढगाचा गडगडाट सुरू झाला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी पावसाचे मोठमोठे थेंब पडू लागले.  त्यानंतर बघता बघता पावसाने जोर धरला. सुमारे पाऊण तास पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यावर पाणी वाहू लागले. तर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सातारकरांची त्रेधातिरपीट उडाली.  छोट्या विक्रेत्यांचेही नुकसान झाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. 

आंब्याचे नुकसान... सातारा शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी आंब्याची झाड लावली आहेत. तसेच रस्त्याच्या बाजूलाही झाडे आहेत. वारे आणि पावसामुळे आंबे गळून खाली पडत आहेत. बुधवारीही पावसामुळे आंबे खाली पडले.  परिणामी आंब्याचे नुकसान झाले. 

टॅग्स :Rainपाऊस