शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नगररचना योजना राबविण्याचा महत्वपूर्ण ठराव

By admin | Updated: January 28, 2015 00:57 IST

मलकापूर नगरपंचायत सभा : ‘डीपीडीसी’मधून चाळीस कोटी निधी देण्याच्या मागणीचाही ठराव

मलकापूर : सुधारित शहर विकास आराखड्यांतर्गत अहमदाबाद पॅटर्नप्रमाणे मलकापूर शहरात टी. पी. (नगररचना) योजना लागू करण्यास राष्ट्रपतींनी अंतीम मंजुरी दिली आहे. ही योजना राज्यात प्रथमच मलकापूर नगरपंचायतीमध्ये लागू होत आहे. ती अंमलात आणण्याचा महत्वपूर्ण ठराव मंगळवारी नगरपंचायतीच्या सभेत करण्यात आला. याशिवाय ‘डीपीडीसी’मधून नागरी भागास ४० कोटी निधी देण्याच्या मागणीचा ठरावही सभेत सर्वानुमते करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनंदा साठे होत्या. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राजेंद्र तेली व सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते. नगरपंचायत सभागृहात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सभेला प्रारंभ झाला. विषय पत्रिकेवरील १५ व ऐनवेळचे ३ अशा एकूण १८ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये विषय क्र. १३ हा मलकापूर शहराच्यादृष्टीने महत्वाचा ठरला. सुधारीत शहरविकास आराखड्यांतर्गत कोणत्याही एका जमिन मालकावर अन्याय होऊ नये म्हणून अहमदाबाद पॅटर्नप्रमाणे जमीन एकत्रिकरण करून विकास करण्यासाठी टी. पी. योजना नगरपालिकांनाही लागू करावी, अशी मागणी मलकापूर नगरपंचायतीने केंद्र शासनाकडे केली होती. त्याबाबत १७ नोव्हेंबर २०१४ ला अध्यादेश काढण्यात आला होता. या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी नुकतीच अंतीम मंजुरी दिली आहे. ही योजना देशातील सर्व नगरपालिकांना लागू झाली असल्याचे पत्र मलकापूरला प्राप्त झाले आहे. राज्यात सर्वप्रथम मलकापुरात ही योजना अमलात आणण्याचा ठराव सभेत करण्यात आला.जिल्हा नियोजन मंडळामार्फत ९ नगरपालिकांची नागरी लोकसंख्या विचारात घेता लोकसंख्येच्या प्रमाणात एकुण निधीच्या १८ टक्के म्हणजेच ४० कोटीच्या आसपास निधी नगरपालिकांना द्यावा. ‘क’ वर्ग नगरपालिकांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांना जादा निधी मिळावा, अशी मागणी करण्याचा ठरावही या सभेत घेण्यात आला.याशिवाय शहरात वीज बचतीसाठी २९९ एल. ई. डी. दिवे बसविणे, नविन प्रशासकीय इमारत व अग्निशामक इमारतीच्या जागेस कुंपन घालणे, स्मशानभूमी, दफनभूमी संरक्षक भिंत बांधणे, शिक्षण व रोजगार हमी कर योग्य रकमेवर आकारण्यासाठी शासनाकडे मागणी करणे, अशा सर्व विषयांना सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली. (वार्ताहर)मलकापूर शहरासाठी शासनाकडून कोट्यावधी निधी उपलब्ध झाला आहे. किरकोळ अडचणी असल्यामुळे काही कामे थांबली आहेत. उपलब्ध निधीचा शहरासाठी वेळेत वापर व्हावा म्हणून ही कामे वेळेतच मार्गी लावणे गरजेचे आहे. घनकचरा, सांडपाणी व विकास आराखड्यातील रस्ते अशा मुलभूत सुविधा वेळेत मार्गी लावण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.