शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव त्वरित सादर करा : -मकरंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:15 IST

तिन्ही तालुक्यांतील अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्याचा आढावा दिला. पुरामुळे झालेले नुकसान व पंचनाम्यांचे सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यात ४५ कुटुंबे विस्थापित केली असून, ६१.३७ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देवाईतील शासकीय आढावा बैठकीत महसूल विभागाला सूचना

वाई : ‘महाबळेश्वर, वाई, खंडाळा तालुक्यांत अतिवृष्टीने आलेल्या पुरात सर्वसामान्यांची घरे, शेती, विहिरी, पिके, जनावरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. त्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावेत. नुकसानग्रस्तांपर्यंत जास्तीत जास्त शासकीय मदत पोहोचवून त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम सर्वांनी करावे,’ असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बोलविलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, बाळासाहेब भिलारे, पंचायत समितीच्या सभापती रजनी भोसले, उपसभापती अनिल जगताप, वाईचे तहसीलदार रणजित भोसले, दशरथ काळे, महाबळेश्वरच्या तहसीलदार मीनल कळसकर, वाईच्या मुख्याधिकारी विद्या पोळ, मुख्याधिकारी शंकर गोरे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, राजेंद्र्र राजपुरे, पंचायत समितीचे सदस्य विक्रांत डोंगरे, मधुकर भोसले, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, राजेश गुरव, महादेव मसकर, शशिकांत पवार, मदन भोसले उपस्थित होते.

तिन्ही तालुक्यांतील अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्याचा आढावा दिला. पुरामुळे झालेले नुकसान व पंचनाम्यांचे सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यात ४५ कुटुंबे विस्थापित केली असून, ६१.३७ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. १५३ घरांचे अंशत: तर सात घरांचे पूर्ण नुकसान झाले. पंधरा गावांमध्ये पाणी पुरवठा योजना, सहा विहिरींचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या सोळा शाळांचे अंशत: नुकसान झाले आहे. तसेच तीन शेळ्या व सहा म्हसींचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार मीनल कळसकर यांनी दिली.

वाई तालुक्यातील मेणवली, खडकी, चिंधवली, सिद्धनाथवाडी येथील सुमारे ९८ कुटुंबे स्थलांतरित केली. २८७ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. ११ विहिरींचे नुकसान झाले असून, नऊ ठिकाणी जमिनी खचल्या आहेत. सतरा शाळांतील २८ खोल्यांचे नुकसान झाले आहे. तर अंदाजे ५,८०९ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. ६२ विद्युत खांब पडले असून, सर्व तालुक्यांत विद्युत पुरवठा सुरळीत सुरू आहे. काही गावांमध्ये बंधारे वाहून गेले आहेत. पाझर तलावांना गळती लागली आहे.

खंडाळा तालुक्यात तीन कुटुंबे स्थलांतरित केली असून, पाच पुलांचे नुकसान झाले आहे. तर २८२ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चौदा रस्त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी सांगितले.यावर आमदार पाटील यांनी पूल, घर तसेच पिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून शासन दरबारी पाठवावेत. तसेच मयत झालेल्या युवकाबाबतही प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना केल्या. तिन्ही तालुक्यांत पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून, सर्वच विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीत चांगले काम केले असल्याचे पाटील यांनी नमूद केले.भूस्खलनाबाबत भूगर्भ शास्त्रज्ञांकडून अहवाल घ्यायावर जे पूल वाहून गेले असतील किंवा रस्ते खराब झाले असतील, त्यांची तात्पुरती डागडुजी करून वाहतूक सुरू करावी. तसेच त्यांचे नवीन प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठवावेत. तसेच भूगर्भ शास्त्रज्ञांना तिन्ही तालुक्यांत जेथे जेथे भूस्खलन झाले आहे, ते दाखवून त्यांच्याकडून अहवाल घ्यावा, अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केल्या. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfloodपूर