शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’तून बेकायदा वाळू उपसा !

By admin | Updated: July 30, 2015 00:33 IST

घोणशीत महसूल विभागाचे दुर्लक्ष : दिवसाढवळ्या बेधडक वाहतूक; पर्यावरणाची हानी, ग्रामस्थांना दमदाटीचे प्रकार

कऱ्हाड : घोणशी, ता. कऱ्हाड येथे गेल्या काही महिन्यांपासून नियमबाह्यरीत्या दिवसन्रात्र होत असलेल्या वाळूउपसा व त्याच्या वाहतुकीवर कोणाचेच नियंत्रण नाही. संबंधित प्रशासनाला हाताशी धरून वाळूठेकेदारांचा राजरोसपणे हा प्रकार सुरू आहे. वाळू ठेकेदारांकडून आता स्थानिकांना दमदाटीचे प्रकारही सुरू झाले असून, त्यांच्या वाढत्या शिरजोरीमुळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.कऱ्हाड तालुक्यात प्रशासनाच्या नियम व अटींना बगल देत वाळू ठेकेदारांकडून अनधिकृत वाळूउपसा व वाहतूक होत असल्याचे प्रशासनाच्या वेळोवेळीच्या कारवाईतून उघड झाले आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी महागाव, ता. जि. सातारा येथील एका अनधिकृत वाळू ठिय्याविरुद्ध स्वत: धडक मोहीम राबवून तेथील नियमबाह्य वाळूउपसा बंद केल्याने जिल्हाधिकारी अनधिकृत वाळू ठिय्यांना चाप बसवतील, अशी अपेक्षा आहे. कऱ्हाड तालुक्यातही नियमबाह्य वाळूउपसा व वाहतूक करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे चित्र दिसत आहे. घोणशी येथील वाळू ठिय्यांवर अशीच परिस्थिती आहे. प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. वाळू ठेकेदारांची परिसरात दहशत वाढली असून, ते मनमानी पद्धतीने वाळूची लूट करीत पर्यावरणाची हानी करीत आहेत. हे ठेकेदार प्रशासनालाही जुमानत नसल्याचे दिसते.घोणशी-कोपर्डे हवेली या संयुक्तिक ठेक्यावर सध्या उपसा सुरू आहे. संबंधित ठेकेदार काहींना हाताशी धरून हा उद्योग करीत आहे. त्याचा वाळूउपसा व वाहतुकीचा धंदा सध्या तेजीत सुरू आहे. महसूल विभागही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत असल्याची स्थिती आहे. महसूल विभागाच्या नावावरच घोणशी परिसरात खुलेआमपणे नियमबाह्य वाळूउपसा व त्याची वाहतूक केली जात आहे. घोणशी, वहागाव येथून वाळू वाहतूूक करणाऱ्या वाहनांकडे प्रशासनाची कसलीच परवानगी नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर गावांत महसूल विभागाच्या कारवाईच्या बातम्या ऐकावयास मिळत असताना घोणशी परिसरात अनधिकृत वाळूउपसा व त्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारवाईच होत नसल्याने ठेकेदारांची शिरजोरी वाढत चालली असल्याचे दिसते.तीन-चार महिन्यांत महसूल विभागाची कसलीही कब्जेपट्टी, परवानगी, पावती नसताना वाळूचे बेकायदा उत्खनन करून शासनाचा लाखोंचा महसूलही बुडविला जात आहे. तसेच वाळू ठेकेदारांनी नियमबाह्य केलेल्या वाळू उत्खननाने परिसरातील पर्यावरणाचेही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. वहागाव, घोणशी, बेलवडे हवेली, तासवडे परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाळू ठेकेदारांनी अनधिकृत साठविलेला वाळूसाठा हासुद्धा चर्चेचा विषय असून, महसूल विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी) ... तर कोपर्डेतील घटनेची पुनरावृत्ती !घोणशीत दररोज रात्रीच्या वेळी नियमबाह्यरीत्या होत असलेल्या वाळूउपसा व वाहतुकीवर जिल्हा महसूल प्रशासन काय कारवाई करणार ? याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. तसेच वाळू ठेकेदारांकडून परिसरातील ग्रामस्थांना होत असलेल्या दमदाटीमुळे कोपर्डे हवेली येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महसूल विभागाने या वाळू उपशावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.... तर कोपर्डेतील घटनेची पुनरावृत्ती !घोणशीत दररोज रात्रीच्या वेळी नियमबाह्यरीत्या होत असलेल्या वाळूउपसा व वाहतुकीवर जिल्हा महसूल प्रशासन काय कारवाई करणार ? याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. तसेच वाळू ठेकेदारांकडून परिसरातील ग्रामस्थांना होत असलेल्या दमदाटीमुळे कोपर्डे हवेली येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महसूल विभागाने या वाळू उपशावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.