शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत आले तर तेच पालिका निवडणुकीत नेतृत्व करतील : शशिकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 15:58 IST

Shivendrasinghraja Bhosale Satara- सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. या बँकेत आम्ही पक्षीय राजकारण येऊ दिले नाही. इथून पुढे देखील रामराजे यांच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करतील, असे सूतोवाच आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले नगरपालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादीत आले तर तेच पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचे नेतृत्व करतील, असा बॉम्बगोळाच आमदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत टाकला.

ठळक मुद्दे शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत आले तर तेच पालिका निवडणुकीत नेतृत्व करतील : शशिकांत शिंदेजिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सुतोवाच

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. या बँकेत आम्ही पक्षीय राजकारण येऊ दिले नाही. इथून पुढे देखील रामराजे यांच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करतील, असे सूतोवाच आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले नगरपालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादीत आले तर तेच पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचे नेतृत्व करतील, असा बॉम्बगोळाच आमदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत टाकला.येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी जनता दरबार आयोजित केला होता, यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख, विजय कुंभार, अतुल शिंदे आदी उपस्थित होते.आमदार शिंदे म्हणाले, 'पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडन्यावर सुरुवातीपासूनच भर दिलेला आहे. जावळी, कोरेगाव हे दोन्ही तालुके माझ्यासाठी जवळचे आहेत. दोन्हीमधील माझे राजकारण सुरूच राहणार आहे. माझ्या विचारांचे लोक जर एकत्र येऊन पक्षासाठी काम करत असतील तर मला देखील पक्षवाढीसाठी आणि पक्षाला फायदा होण्यासाठी प्रयत्न करायला नकोत काय? त्याचा कोणाला त्रास होत असेल तर मी काय करू शकणार आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यावर आम्ही भर दिला आहे; परंतु ज्या ठिकाणी विरोध होईल, तिथे ताकदीने निवडणूक लढली जाईल.'जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यावर आम्ही भर दिला. त्यामुळे दिवसेंदिवस जनता दरबाराला प्रतिसाद वाढत आहे आजच्या जनता दरबारामध्ये ८१ तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि तात्काळ या तक्रारींचा निपटारा जागेवरच करण्यात आला, असेदेखील आमदार शिंदे म्हणाले.सदाभाऊंचा ट्रॅक चुकलायज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय अनेकांना महत्त्व प्राप्त होत नाही. सदाभाऊ अशा भूमिकेतूनच टीका करत आहेत. वास्तविक ते शेतकऱ्यांचे नेते आहेत. केंद्र शासन शेतकऱ्यांना खड्ड्यात घालायला निघाले आहे. त्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांनीच पाठिंबा द्यायला हवा होता. सदाभाऊ यांचा ट्रॅक चुकला आहे.केंद्र शासन आंदोलनाला जुमानत नाहीपेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस यांचे दर गगनाला भिडलेले आहेत. दर पंधरा दिवसाला हे दर वाढत असून सामान्य नागरिकांची कुचंबणा होताना पाहायला मिळते. हे दर वाढत राहणार, अशी सवय लागून गेलेली आहे. केंद्र शासन आंदोलनांना जुमानत नाही, अशी परिस्थिती आहे. 

जिल्हा बँकेला जावळीतून ठोकला शड्डूशिवेंद्रसिंहराजेच काय माझा कुठल्याही नेत्याशी वैयक्तिक वाद नाही. पक्षाची ताकद टिकून ठेवायची असेल तर मला काम करावेच लागेल. कोणाला वाईट वाटते म्हणून पंचायत समिती, जिल्हा परिषद सोडायची का? काही दिवसांनी विधानपरिषद, डीपीडीसीची निवडणूक लागेल, राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या तरच या निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे. जिल्हा बँकेला जावळी सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढणार आहे.- शशिकांत शिंदे, आमदार

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेSatara areaसातारा परिसर