शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेत्यांनी जर हस्तक्षेप केला नाही तर... तो गावात येणार नाही... आरोग्य यंत्रणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 12:33 IST

कोरोना हा केवळ एकमेकांच्या संसर्गाच्यामुळे होतो. तो टाळण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी लागू केली आहे. परजिल्ह्यातून कोणी येऊ नये, म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. गावपातळीवर ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य यंत्रणा व पोलीस सतर्क असल्याने अनेक गावांनी सुरक्षित ठेवण्यात यश मिळवले आहे.

ठळक मुद्देयातून सुटका करण्यासाठी होम क्वारंटाईन असतानासुद्धा हातावर शिक्का न मारण्यासाठी आरोग्य कर्मचारी व संबंधित विभागातील डॉक्टर यांना या कामात स्थानिक नेते व पदाधिकारी हस्तक्षेप करून अडचणी वाढवत आहेत. .

खटाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यातूनही अनेकजण पुणे, मुंबईहून स्वगृही परतले आहेत. त्यांनी शासकीय यंत्रणेकडे नोंद करणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी थांबण्यास सांगितले जाते; पण अनेक तरुण विविध कारणं देऊन शिक्का न मारण्याची विनंती करत आहेत. त्यातीलच एक म्हणजे आई आजारी आहे. बाहेर जाता येणार नाही.

कोरोना हा केवळ एकमेकांच्या संसर्गाच्यामुळे होतो. तो टाळण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी लागू केली आहे. परजिल्ह्यातून कोणी येऊ नये, म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. गावपातळीवर ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य यंत्रणा व पोलीस सतर्क असल्याने अनेक गावांनी सुरक्षित ठेवण्यात यश मिळवले आहे.

खटावला याला अपवाद ठरला आहे. अनोळखी लोकांचा वावर वाढला असल्यामुळे स्थानिकांच्या मनात मात्र भीतीचे वातावरण दिसून येत आहे. आरोग्य विभाग आता डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. त्यांना आशा सेविका, अंगणवाडी सेविकाचे चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत आहे. कोणत्याही घरात अनोळखी तसेच बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीवर त्या बारकाईने नजर ठेवून आहेत. कोणी आढळल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र्रात जाऊन तपासणी करून घेण्यासाठी तगादा लावत आहेत. परंतु त्यांच्याही हातावर तुरी देण्याचे काम काही महाभाग करत आहेत.

बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला होम क्वारंटाईनचा शिक्का मारणे बंधनकारक आहे. हा शिक्का मारला तर मोकळेपणाने फिरण्यावर निर्बंधे येतील, यातून सुटका करण्यासाठी होम क्वारंटाईन असतानासुद्धा हातावर शिक्का न मारण्यासाठी आरोग्य कर्मचारी व संबंधित विभागातील डॉक्टर यांना या कामात स्थानिक नेते व पदाधिकारी हस्तक्षेप करून अडचणी वाढवत आहेत..शासकीय नियमांचे कठोर पालन व्हावेवास्तविक, ग्रामीण भागात अजून कोरोनाने शिरकाव झालेला नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांना घरातच बसवले तर त्यांच्यामुळे इतरांना धोका पोहोचणार नाही. मात्र कारवाई करण्यात आरोग्य विभागापुढे अडचणी येत आहेत. राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने मात्र तो लवकरच गावात यायला कमी करणार नाही, अशी प्रतिक्रिया सध्या शासनाने लावलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणा-या सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे

टॅग्स :Medicalवैद्यकीयPoliticsराजकारणCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या