शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

एक भगदाड मुजविले तर दुसरीकडे पडले!

By admin | Updated: September 18, 2016 00:06 IST

आरळे पुलाची चाळण : पाच ब्रास खडीचा वापर झाल्याने वाहन चालकांमध्ये भीती; शशिकांत शिंदे यांच्याकडून पुलाची पाहणी

शिवथर : सातारा-लोणंद रस्त्यावरील आरळे-वडूथ येथील कृष्णा नदीवरील पुलावर तसेच पुलाच्या पायथ्याजवळ शुक्रवारी भगदाड पडले होते. त्यामुळे हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केला. पाच ब्रास खडी टाकून खड्डे मुजविले; परंतु त्याच रात्री दुसऱ्या ठिकाणी पुलाला पुन्हा भगदाड पडले. त्यामुळे पुलाची चाळण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आमदार शशिकांत शिंदे यांनी शनिवारी पुलाची पाहणी केली.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोल चुकविण्यासाठी सातारा-लोणंद रस्त्यावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. पुलावर झाडे वाढल्या असून, झाडाच्या मुळ्या खोल्यावर गेल्या आहेत. पुलाच्या कडेला पोकळी निर्माण झाली आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. सातारा-लोणंद रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोन वर्षे लागतील; परंतु काही दुर्घटना घडू नये, यासाठी पुलाचे फोटो काढून दुरुस्तीचा प्रस्ताव दोन दिवसांमध्ये देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी निधी मिळावा म्हणून मंत्रांशी लवकर चर्चा करणार आहे.त्यावेळी कृषी सभापती किरण साबळे-पाटील, बबनराव साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. एच. मोहिते, कार्यकारी अभियंता एल. एन. वाघमोडे, शाखा अभियंता डी. पी. वंजारी, सी. व्ही. कांत, मिलिंद कुलकर्णी, अरविंद पाटील, विजय कदम, आबा कासकर, अनिल वाघमळे, वैभव कदम उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुण्याच्या तज्ज्ञांना पाचारणउन्हाळा सुरू असल्याने पुलाची परिस्थिती जाणवली नाही. सध्या पाऊस सुरू असल्याने भगदाड जाणवले. पुण्याचे तज्ज्ञ सोमवारी येणार असून, मंगळवार, बुधवारी काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ई. ई. वाघमोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.तीन महिन्यांपूर्वी कसली केली होती पाहणी?चौथी घटनाया पुलाच्या कडेला आजवर चारवेळा भगदाड पडले आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी तात्पुरती मलमपट्टी न करता पुलाचे चांगल्या पद्धतीने काम करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील यांनी केली आहे.विद्यार्थ्यांसाठी एसटीची धडपडहा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी एसटीची फेरी कशी सुरू करायची, या संदर्भात सातारा आगारातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिवथर-बोरखळ, लिंब, कोरेगाव येथे जाऊन पाहणी केली असल्याचे सहायक वाहतूक अधीक्षक नौशाद तांबोळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.