शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

..तर त्याला जागेवर गोळ्या घाला - उदयनराजे भोसले

By प्रमोद सुकरे | Updated: April 11, 2023 15:52 IST

पुढे मागे बघायचे नाही डायरेक्ट शूट ॲट साईट करून टाकायचे

कऱ्हाड : ‘समाजातील गुन्हेगारीच्या घटना रोखायच्या असतील आणि एखादा गुन्हेगार गुन्हा करत असेल तर त्याला पोलिसांनी डायरेक्ट शूट ॲट साईट करावे,’ असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी आपल्या काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. ते पुन्हा एका त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी समाजात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत प्रतिक्रिया दिली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या डीपी जैन कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत खासदार उदयनराजे भोसले यांनी चर्चा केली.यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उदयनराजे म्हणाले, कायद्यात भरपूर पळवाटा आहेत. उदाहरणार्थ १६ ते १८ वयाच्या आतील गुन्हेगार मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुन्हा केल्यानंतर त्यांना रिमांडहोम तसेच बाळ सुधारगृहात ठेवले जाते. नंतर ते त्या ठिकाणाहून सुटतात. माझं तर एकच म्हणणं आहे की, एखाद्याला खलास करायचा असेल आणि त्यासाठी त्याचे जर डोके एवढं चालत असेल तर पुढे मागे बघायचे नाही डायरेक्ट शूट ॲट साईट करून टाकायचे.’‘जोपर्यंत समाजास उदाहरण दिले जात नाही तोपर्यंत अशा घटना चालतच राहणार आहेत. गुन्हेगारी कशी थांबवणार? कशा प्रकारे अत्याचाराच्या घटना थांबविणार? डायरेक्ट कारण वकील मंडळी भरपूर आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर मी स्वतः एखादा गुन्हा केला की नंतर मी वकील देणार आणि बाकीचे जे आहेत की त्यांच्यावरती सुद्धा अत्याचार झाला आहे. त्यांच्याकडे तेवढा पैसा नसल्याने ते पोलिस ठाण्यात जातात. त्या याठिकाणी गेल्यानंतर पोलिसच त्यांच्यावर गुन्हा दाखल करतात. त्यांनाच आतमध्ये टाकतात,’ असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले