शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

अंगणवाडीच्या मुलांना मिळाले ओळखपत्र

By admin | Updated: September 4, 2014 00:09 IST

बानुगडेवाडी : शाळेच्या आवडीसाठी उपक्रम

कऱ्हाड : बानुगडेवाडी येथील अंजुमन महिला सार्वजनिक विकास संस्थेमार्फत अंगणवाडीच्या मुलांना आकर्षक ओळखपत्र व खाउचे वाटप करण्यात आले. लहान वयात मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविला असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा शहिदा मुजावर यांनी सांगितले. बानुगडेवाडी येथील अंजुमन महिला संस्था ही महिलांचे सशक्त व्यासपीठ असून संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून येथील अंगणवाडीच्या सर्व मुलांना आपली स्वत:ची ओळख करून देणारे आकर्षक ओळखपत्र तयार करून देण्यात आले आहे. तसेच अंगणवाडीपासून ते चौथीपर्यंतच्या सर्व मुलांना खाउचे वाटप करून आपल्या सामाजिक संस्थेचा वर्धापनदिन त्यांनी साजरा केला आहे. संस्थेच्या सदस्या माजी सरपंच सौ. सुरेखा बानुगडे यांनी अंगणवाडीस भिंतीवरील घडयाळाची भेट दिली. संस्थेने बानुगडेवाडीसह परिसरातील विधवा, परितक्त्या महिलांना निराधार योजना, ६५ वर्षापुढील महिलांना श्रावणबाळ योजना या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. समाजातील अशा महिलांनी संस्थेशी संपर्क साधावा असे यावेळी उपाध्यक्षा नफिसा मुजावर यांनी आवाहन केले.यावेळी मंदाकिनी मांडवेकर, सुरेखा मांडवेकर, हसिना मुजावर, बेगम मुजाावर, लता संकपाळ, शेहनाज मुजावर, हापिशा मुजावर आदींची उपस्थिती होती. अंगणवाडी सेविका नूरजहाँ मुजावर यांनी आभार मानले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)