शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न मार्गी लावल्यानंतर मला पाणी पाजणाऱ्यांचे तोंड बंद होईल : उदयनराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:06 IST

भविष्यातील पाण्याची गरज पाहता कास धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर बोंडारवाडी धरणाचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो मार्गी लावल्यानंतर मला पाणी पाजण्याची भाषा करणाऱ्यांचे तोंड तरी बंद होईल, असा उपरोधिक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

ठळक मुद्देप्रश्न मार्गी लावल्यानंतर मला पाणी पाजणाऱ्यांचे तोंड बंद होईल : उदयनराजेकास धरणातील पाणी परिस्थितीचा घेतला आढावा

सातारा : भविष्यातील पाण्याची गरज पाहता कास धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर बोंडारवाडी धरणाचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो मार्गी लावल्यानंतर मला पाणी पाजण्याची भाषा करणाऱ्यांचे तोंड तरी बंद होईल, असा उपरोधिक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.कास जलाशयातील पाणी परिस्थितीचा खासदार उदयनराजे यांनी सोमवारी सकाळी पालिकेचा पाणीपुरवठा विभाग व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.प्रारंभी कास व परिसरातील ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने सोडविल्या जातील, अशी ग्वाही उदयनराजे यांनी दिली. यानंतर ते म्हणाले, वाढते शहरीकरण, लोकसंख्येचा विचार करता कास धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या धरणाचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले आहे. सातारकरांना भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की कोणीही पाण्याचा अतिरेक करावा.जलाशयात केवळ पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. नासाडी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पालिकेला देण्यात आल्या आहेत.कासबरोबरच अनेक वर्षांपासून रखडलेल्या बोंडारवाडी धरणाच्या उभारणीसाठी ही माझे प्रयत्न सुरू सुरू आहेत. याबाबतचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहेत त्यासाठी वाट्टेल ते केले जाईल.

पाणीप्रश्न मार्गी लागल्यानंतर निदान आम्हाला पाणी पाजण्याची भाषा करणाऱ्यांचे तोंड तरी बंद होईल, असेही उदयनराजे म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष माधवी कदम, पाणीपुरवठा समिती सभापती श्रीकांत आंबेकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर