शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

भुकेल्यांसाठी धावतायेत आई प्रतिष्ठानचे शिलेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

पाचवड : वाई तालुक्यातील अमृतवाडी येथील आई प्रतिष्ठानचे शिलेदार आणि परिसरातील काही युवक लॉकडाऊन काळात एकत्र येऊन पाचवड, भुईंज ...

पाचवड : वाई तालुक्यातील अमृतवाडी येथील आई प्रतिष्ठानचे शिलेदार आणि परिसरातील काही युवक लॉकडाऊन काळात एकत्र येऊन पाचवड, भुईंज परिसरातील रुग्णालयांमधील रुग्ण, रुग्णांच्या नातेवाइकांना त्याशिवाय इतर अनेकांना स्वच्छ, सकस, परिपूर्ण भोजन दररोज जागेपोहोच करतात, तेही निरपेक्ष भावनेने आणि स्वयंप्रेरणेने हे सारंच चकित करणारं आणि भारावून टाकणार आहे.

केवळ रुग्णालयातच नव्हे तर महामार्गावरील ट्रकचालक, कष्टकरी, मजूर, निराधार, कातकरी वस्तीवरील लोक किंवा अगदी भिक्षेकरी.. असे कोणी जे-जे भुकेले, त्या त्या भुकेल्या जिवांना जागेपोहोच मोफत अन्नसेवेचा यज्ञ या युवकांकडून चालवला जात आहे.

सद्य:स्थितीतील या अंधारल्या दाही दिशांत काम करणारे हे सारे युवक म्हणजे प्रकाशाचे वारसदार. ‘आई फाउण्डेशन’च्या या उपक्रमाद्वारे केवळ भुकेल्यांनाच अन्न दिले जात नाही तर या महत्कार्यापलीकडे जाऊन परिसरातील निराधार, वयोवृद्ध महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे आणि औषधांचेदेखील मोफत वितरण केले जातेय. लॉकडाऊनमध्ये आलेल्या आर्थिक अडचणीमुळे औषधांपासून संबंधित गरजू वंचित राहू नये, याचाही त्यांनी विचार केलाय. ही कळकळ, तळमळ दाद देण्याजोगी.

अगदी पाचवड येथे बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलीस, होमगार्ड‌्सनादेखील सकाळ-संध्याकाळ नास्ता पोहोच केला जातोय. तसेच या उपक्रमातील दररोजच्या जेवणामध्ये चपाती, भाजी, भात, आमटी असतेच शिवाय रुग्णालयामध्ये प्रसूती झालेल्या मातांसाठी साजूक तूप घातलेला इंद्रायणी तांदळाचा गीजगा भात आणि वरण असे भोजन पोहोचवले जात आहे. भल्या सकाळी सहा-साडेसहा वाजता हे सारेजण पाचवडमध्ये कामाला सुरुवात करतात. स्वच्छता आणि आवश्यक त्या सर्व खबरदारी घेत जेवण बनवले जाते. हे बनवण्यासाठी ज्या आचारी मामांना बोलावले तेदेखील या युवकांची तळमळ पाहून कामाचा मेहनताना घेईनासे झालेत. सामान्य माणसाच्या अंगी असणारे कृतज्ञतेचे बळ दिसून येते ते असे. जेवण तयार झाल्यानंतर त्याचे पॅकिंग करून जिथून-जिथून मागणी तिथे तिथे पोहोच करायला गाडी रवाना होते.

या सर्व कामात त्यांना जे अनुभव येतायत ते त्यांचं बळ वाढवणारेच आहे. एकच उदाहरण सांगायचे तर अगदी बंगलोरहून इथपर्यंत उपाशी आलेले ट्रकचालक जेव्हा या उपक्रमाचा लाभ घेतात त्यावेळी डोळ्यात पाणी आणून या युवकांना धन्यवाद देतात. सर्वच काही बंद असल्याने काही सुस्थितील लोकदेखील जेव्हा त्यांच्या या उपक्रमाचा लाभ घेतात, तेव्हा या युवकांना आर्थिक मदत देऊ करतात; पण आर्थिक मदत ते स्वीकारतच नाहीत. त्यामुळे मग कोणी साहित्य रूपाने मदत करतो.

आनेवाडी टोलनाक्यापासून वेळे गावापर्यंत भुकेल्यांना अन्न पोहोचविण्यासाठी हे सर्वजण धावतायेत. स्वतःची पावलंही उमटू न देता मदतीची एकसे बढकर एक भव्य शिल्प साकारत पुढे चाललेल्या या आई प्रतिष्ठानच्या शिलेदारांचे परिसरात कौतुक होत आहे.