शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

हास्यकल्लोळात सखी रमल्या

By admin | Updated: November 24, 2014 23:13 IST

दिलीप हल्याळ आणि मृदुला मोघे यांनी विनोदाचा खजिना सखींसमोर सादर केला.

फलटण : येथील ‘लोकमत सखीमंच’ आयोजित दिलीप हल्याळ व मृदुला मोघे यांच्या ‘हास्यषटकार’ या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली आणि त्यानंतर दिलीप हल्याळ आणि मृदुला मोघे यांनी विनोदाचा खजिना सखींसमोर सादर केला. कलाकारांच्या उत्तुंग अभिनय अविष्कार या निमित्ताने सखींना पाहायला मिळाला. कार्यक्रमामध्ये विनोदाबरोबरच मंत्रमुग्ध करणारी नव्या व जुन्या जमान्यातील गाणीही सखींना ऐकण्यास मिळाली.दिलीप हल्याळ आणि मृदुला मोघे या दोघांनी लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण या आयुष्याच्या तिन्ही कालखंडाचे विनोदातून वर्णन केले. लहानपण सांगताना मुलेही किती हुशार झाली आहेत आणि ती मोठ-मोठ्या माणसांची सुध्दा फजिती करू शकतात, हे त्यांनी आपल्या विनोदातून सांगितले. तरुणपण सांगताना आपण प्रेमात कसे पडलो, प्रेम पडल्यावर कसे वाटते. ‘पाऊस नसतानाही चिंब भिजल्यासारखे वाटते’ असे सांगून हल्याळ यांनी टाळ्या मिळविल्या. कॉलेजमध्ये काय काय किस्से घडतात आणि कॉलेज लाईफ संपल्यानंतर सुरुवात होते ती संसाराची. त्यामध्ये नवरा-बायकोमधील भांडणे, विनोदी रुपात त्यांनी मांडली. पुण्यामधील लोकांची संस्कृती आणि त्यांचे स्वभाव हे देखील त्यांनी आपल्या अभिनयाने सखींसमोर मांडले. शेवटी-शेवटी म्हातारपणी मुलं सोडून गेल्यावर आई-वडिलांची काय अवस्था होते, हे त्यांनी विनोदातून अत्यंत चांगल्या पध्दतीने सांगत भारतीय संस्कृती विशद केले.तीन तास चाललेल्या या कार्यक्रमामध्ये सखींनी टाळ्यांचा पाऊस पाडला. या कार्यक्रमाच्या शेवटी चंदूकाका सराफ यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या सुवर्ण नथीच्या मानकरी विजया मोहन कोरे या ठरल्या. यावेळी सखी ब्युटी पार्लरतर्फे फेशियलचा लकी ड्रॉ काढण्यात आला. (प्रतिनिधी)