शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

शिकारी खुद यहाँ ‘शिकार’ हो गया..!

By admin | Updated: November 24, 2015 00:30 IST

देखण्या प्राण्याचा करूण अंत : अनुकूलशीलता बेततेय बिबट्याच्या जिवावर; वन सोडून ‘जनवासी’ झाल्याने शिकाऱ्यांचा ‘वॉच’--लोकमत विशेष

संजय पाटील -- कऱ्हाड--बिबट्या हा मार्जार कुळातला प्राणी. जेवढा देखणा तेवढाच आक्रमक़ जेवढा चपळ तेवढाच चाणाक्ष. शिकारी म्हणूनही त्याची ख्याती आहे; पण जिथे जाईल तिथे वास्तव्य हाच त्याचा खरा ‘विक पॉइंट’. श्वापदं शक्यतो वनात राहतात; मात्र बिबट्या कुठेही वावरतो. भक्ष्य मिळेल तिथे वास्तव्य करतो, त्यामुळेच सध्या ‘वनवास’ सोडून तो ‘जनवासी’ झालाय. लोकवस्तीच्या आसपास वावरू लागलाय. त्यातूनच त्याची शिकार होतेय.तळबीड, वसंतगड, डेळेवाडी, आरेवाडी, गमेवाडी, पाठरवाडी, दक्षिण तांबवे, चचेगाव, विंग, ओंड, उंडाळे, येवती गावांच्या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. ठिकठिकाणी बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. तसेच ग्रामस्थांवरही हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ग्रामस्थांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले आहे, तर अनेकांनी ऐकीव माहितीवरच त्याची भीती खाल्ली आहे. आजही काही गावांतील ग्रामस्थ बिबट्याच्या वावराची चर्चा असलेल्या शिवारात जाण्यास घाबरतात. बिबट्या सध्या तिथे नसला तरी त्याबाबत झालेल्या चर्चेमुळेच अनेकजण अशा परिसरात जाणे टाळतात. वास्तविक, बिबट्या हा वनात राहणारा ‘वनवासी’ प्राणी. गावोगावी सध्या त्यांची जेवढी संख्या आहे, त्याहीपेक्षा कित्येक पटीने जास्त बिबट्या वनक्षेत्रात वावरतात. मात्र, अनुकूलनशीलता हा त्याचा स्वभाव असल्याने जिथे भक्ष्य मिळेल तिथे तो वास्तव्य करतो. सध्या वनासह लोकवस्तीच्या आसपासही बिबट्यांना खाद्य उपलब्ध होऊ लागले आहे. कुत्रा हा त्याचे खाद्य नसले तरी उपासमार टाळण्यासाठी तो कुत्र्याचीही शिकार करतो. प्रसंगी तो उंदीरही खातो. तसेच शिवारात चरावयास नेली जाणारी पाळीव जनावरेही फस्त करतो. शिकार आयती उपलब्ध होत असल्यानेच बिबट्या ‘जनवासी’ होऊ लागलाय. परिस्थितीशी जुळवून घेण्याची बिबट्याची क्षमता जास्त आहे. इतर प्राणी ठराविक वातावरणातच राहू शकतात. गर्द झाडी किंवा मानवी वावर नसलेल्या प्रदेशातच त्यांचे वास्तव्य असते. मात्र, बिबट्या सर्वदूर फिरतो. कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वातावरणात तो स्वत:ला जमवून घेतो. त्याची शारीरिक रचनाही त्याच पद्धतीची आहे. तसेच त्याची कातडी कोणत्याही ‘बॅकग्राऊंड’शी समरस होते. त्यामुळे गर्द झाडीत, वाळलेल्या पालापाचोळ्यात, गवतात, उसात किंवा अगदी मोकळ्या रस्त्यावरही सहजासहजी तो दृष्टीस पडत नाही. अगदी जवळ आल्यानंतरच तो लक्षात येतो. निसर्गाच्या वरदानामुळेच बिबट्या धिटाईने मानवी वस्तीच्या जवळ येतो. खाद्य मिळवतो व परत तेथून काही अंतरावर जाऊन वास्तव्य करतो. मानवी वस्तीनजीक बिबट्याचा वाढलेला वावर शिकाऱ्यांसाठी नक्कीच लाभदायक ठरत आहे. एखाद्या शिवारात बिबट्याचा वावर आहे, अशी माहिती मिळाल्यास शिकारी त्याच्यावर पाळत ठेवतात. वेळ साधून ते त्याची शिकार करतात. ही शिकार बंदुकीच्या साह्याने किंवा वागर लावूनही केली जाणे शक्य असते. तीक्ष्ण हत्यारांचा वापर करून बिबट्याला ठार केले जाते व त्यानंतर नख्यांसाठी त्याचे पंजे, शेपूट व दात गायब केले जातात. या अवयवांची तस्करी करून हजारो रुपये कमावता येतात, असे सांगितले जाते. अब तक दस : वसंतगडचा अकरावा !कऱ्हाडसह पाटण तालुक्यात गत काही वर्षांमध्ये दहा बिबट्यांचा हकनाक बळी गेला आहे. वसंतगडमध्ये मृतावस्थेत आढळलेला बिबट्या अकरावा आहे. येणके येथे ग्रामस्थावर हल्ला करणाऱ्या बिबट्यास ग्रामस्थांनी कुऱ्हाडीचे घाव घालून व काठीने मारहाण करीत ठार केले होते. जानेवारी २०११ मध्ये कऱ्हाडमध्ये एका बिबट्याला पोलीस अधिकाऱ्यांनी गोळ्या घातल्या. दक्षिण तांबवे शिवारात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला. गारवडे व त्यानंतर विंगमध्ये आढळलेल्या जखमी बिबट्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पाटण, महाबळवाडी, डफळवाडी, चांदोली खोरे येथे प्रेत्येकी एक बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. सातारा येथे महामार्गावरही वाहनाच्या धडकेत एका बिबट्याला जीव गमवावा लागला होता. बिबट्याप्रवण क्षेत्रात वाढज्या-ज्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन होते, अशा ठिकाणांची वनविभागाकडून नोंद ठेवली जाते. गतर्षी पूर्वीच्या नोंदीसह आणखी ३९ ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याचे वनविभागाची आकडेवारी सांगते. यावर्षीही बिबट्याप्रवण क्षेत्रात वाढ झाली असण्याची शक्यता आहे. यावरून विभागात बिबट्यांची संख्या वाढल्याची शक्यताही नाकारता येत नाही. नखं अन् दातांचं होतं काय?नखे, दात व कातडीसाठी बिबट्याची शिकार केली जाते. मात्र या अवयवांचे पुढे काय केले जाते, हा संशोधनाचा विषय आहे. काही प्राणीमित्रांच्या म्हणण्यानुसार, बिबट्याच्या नखे व दातांची औषधाच्या नावाखाली तस्करी केली जाते. तसेच नखे व दात गळ्यामध्ये बांधण्याचेही ‘फॅड’ आहे. कातडीचा शोभेसाठी वापर केला जात असल्याचे सांगितले जाते. बिबट्या तळबीड शिवारातील ?गडाच्या एका बाजूस वसंतगड गावठाण व शिवार आहे, तर दुसऱ्या बाजूस तळबीड गावठाण व शिवार आहे. काही महिन्यांपूर्वी तळबीडमध्ये लोकवस्तीनजीक बिबट्या दोन बछड्यांसह दिसला होता. उसाच्या फडात लपून बसलेल्या बिबट्याची छायाचित्रे त्यावेळी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून ‘व्हायरल’ झाली होती. त्यामुळे सोमवारी वसंतगडमध्ये आढळलेला मृत बिबट्या तळबीडचा आहे का? याबाबतही घटनास्थळी चर्चा होती.