शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यनमस्कार स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

By admin | Updated: December 19, 2014 00:31 IST

मुलींची आघाडी

मलकापूर : येथील मळाईदेवी शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून सुर्यनमस्कार स्पर्धांचे आयोजन केले होते़ वयोगटानुसार ७ गटात अयोजित संस्थांतर्गत स्पर्धेत बालवाडी ते महाविद्यालयातील ९५० विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला होता़ संस्थेचे सचिव अशोकराव थोरात यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला़ यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भस्करराव पाटील, प्राचार्य आऱ आऱ पाटील, जे़ एऩ कराळे, एस़ एस़ शिंदे, शरद तांबवेकर, सुरेश शिंदे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते़ यावेळी अशोकराव थोरात म्हणाले, विद्यार्थ्यांना बालपणातच व्यायामाची आवड निर्माण झाली, तर ती चिरकाळ टिकते, या वयात विद्यार्थ्यांनी दोनशेहून अधिक सुर्यनमस्कार घातले हे कौतुक आहे़ उद्याचे नागरिक आरोग्यपूर्ण घडविण्यासाठी अशा स्पर्धांचे वारंवार आयोजन करावे़ या स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना आहार, योगाविषयी पुस्तीका व प्रशस्तीपत्रक देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सुत्रसंचालन शरद तांबवेकर यांनी केले तर सुरेश शिंदे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)मुलींची आघाडी मलकापूरात मळाईदेवी शिक्षण संस्थेने संस्थांतर्गत सुर्यनमस्कार स्पर्धांचे अयोजन केले होते़ स्पर्धेस प्रारंभ झाल्यानंतर काही वेळाने थकल्यामुळे मुलांची संख्या हळूहळू कमी होत गेली; मात्र मुलींनी दोनशे पेक्षा जास्त सुर्यनमस्कार घालून काही गटात आघाडी मिळवली़