शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो सातारकरांचा दिल्लीत जल्लोष

By admin | Updated: February 10, 2015 23:57 IST

विविध क्षेत्रातील नागरिकांच्या प्रतिक्रिया : सामान्यांना गृहित धराल तर लाटा अशाच येतील आणि ओसरतीलही...

सातारा : राजधानी दिल्लीच्या विधानसभेतील ७० पैकी ६७ जागा पटकावून आम आदमी पक्षाने संपादन केलेल्या ऐतिहासिक विजयाचे पडसाद साताऱ्यातही उमटले. विशेषत: देशभरात नरेंद्र मोदींची लाट असताना त्यांच्या भारतीय जनता पक्षाला राजधानीत केवळ तीनच जागा मिळाल्याने दिवसभर सगळीकडे हाच चर्चेचा विषय बनला होता. ‘मोदींची लाट ओसरते आहे का आणि असेलच तर कशामुळे,’ याच मुद्द्याभोवती चर्चा फिरत असल्याने ‘लोकमत’ने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. एकाधिकारशाही आणि खोट्या आश्वासनांना जनतेने दिलेले हे प्रत्युत्तर आहे, असाच अभिप्राय बहुतेकांनी दिला. कोणीही कितीही मोठे वादे केले आणि कितीही प्रचंड जाहिरातबाजी केली तरी प्रगल्भ लोकशाही असलेल्या भारतीय जनतेला काही दिवसांनंतर त्यातील फोलपणा कळून चुकतोच, असा विश्वास बहुतेकांनी व्यक्त केला. केंद्रात सत्तेवर येताच नरेंद्र मोदींनी पक्षातील कार्यकर्त्यांना दुर्लक्षून अमित शहांच्या जोडीने पक्षात एकाधिकारशाही निर्माण केली. तीच सरकारमध्येही आणली. अनेक निर्णय संसदेला टाळून वटहुकुमांच्या आधारे घेतले. जमीन अधिग्रहण कायदा, कामगार कायद्यांमधील बदलांचा निर्णय असो वा नियोजन आयोग बरखास्त करण्याचा, बहुमताच्या जोरावर ते रेटले गेल्यामुळेच देशभरात असलेल्या मोदी लाटेला ओहोटी लागली, असे मत व्यक्त करण्यात आले. अवास्तव आश्वासनांबरोबरच मोदींच्या बोलण्यातील आणि कृतीतील फरकही अनेकांनी ओळखला असल्याचे जाणकारांच्या प्रतिक्रियांमधून दिसून आले. याबरोबरच पैसा आणि बाहुबळाच्या जोरावर निवडणुका लढविण्याचे दिवस संपले असल्याचा संदेश दिल्लीच्या जनतेने सर्वच पक्षांना दिला आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. घराघरात जाऊन लोकांची कामे करणारे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणारे कार्यकर्ते असल्यामुळेच ‘आप’ने हा विजय संपादन केल्याचे मत व्यक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)शपथविधीला करणार आनंद व्यक्तआम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सातारा जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते दिल्लीला गेले आहेत. पक्षाने अभूतपूर्व विजय संपादन केल्यावर या कार्यकर्त्यांच्या कष्टाचे चीज झाले. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यांनी एकच जल्लोष केला. येत्या १४ तारखेला अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तेव्हा साताऱ्यातील कार्यकर्ते पोवई नाक्यावर पेढे आणि साखर वाटून आनंद साजरा करणार आहेत.मोदींची लाट इथं दिल्लीत दिसतच नाही. इथं फक्त केजरीवालांची सुनामी दिसते. मोदींनी प्रचारादरम्यान केजरीवालांवर फक्त चिखलफेक केली. केजरीवालांनी मुद्द्यांचे राजकारण केले. मी २७ तारखेपासून दिल्लीत आहे. अजय माकन यांच्या सदर बझार मतदारसंघात आठ दिवस काम केलं. त्यानंतर किरण बेदींच्या कृष्णानगर मतदारसंघात काम केलं. घराघरात जाऊन प्रचार करण्यावर आम्ही भर दिला, त्यावेळी जाणवलं की, ४९ दिवसांच्या केजरीवाल सरकारनेही आश्वासने पूर्ण केली, हे लोक अजून विसरलेले नाहीत. केजरीवाल यांच्यावर लोकांचा मोठा विश्वास आहे. प्रचार संपताच सातारा जिल्ह्यातून आलेल्या १५० कार्यकर्त्यांना राहण्याची ठिकाणे सोडण्याचे आदेश पक्षाने दिले. त्यानुसार इतरत्र मुक्काम करून आम्ही जल्लोष साजरा करण्यासाठी इथं थांबलो आहोत. १४ तारखेला पोवई नाक्यावर पेढे वाटून आम्ही आनंद साजरा करणार आहोत. - सागर भोगावकर, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पक्षमोदी लाट ओसरली आहेच; पण हा दुय्यम भाग आहे. मुख्य म्हणजे, दिल्लीची निवडणूक राजकारणाला दिशा देणारी ठरली आहे. सामाजिक कार्यकर्त्याला राजकारणात आता स्थान द्यावेच लागेल. पैसा आणि दंडेलीच्या जोरावर निवडणुका लढवून चालणार नाही, असा संदेश देणारा हा क्रांतिकारी विजय आहे. हीच खरी सुनामी असून ती संपूर्ण देशात उसळेल. सामान्य माणूस पंतप्रधानही होऊ शकेल. काम केल्याशिवाय, गरिबांचा विचार केल्याशिवाय निवडणूक जिंकता येणार नाही, धंदा म्हणून राजकारण करता येणार नाही, तर देशसेवा म्हणूनच ते करावे लागेल, हा धडा सर्वच पक्षांनी या निवडणुकीतून घ्यावा. सातारा जिल्ह्यातही आता तरुणांनी आम आदमी पक्षाकडे धाडसाने आले पाहिजे. कल्याणकारी राजकारण सत्यात उतरायला किती काळ लागेल हे सांगता येत नसले तरी या प्रक्रियेचा वेग या निवडणुकीमुळे नक्कीच वाढणार आहे.- चंद्रशेखर चोरगे, माजी जिल्हा संयोजक, आम आदमी पक्षसामान्य नागरिकांनी पैशांपेक्षा जनहिताला अधिक महत्त्व दिल्याचे दिल्लीच्या निकालातून दिसून आले. मोदींची लाट ओसरते आहे हे वास्तव आहे. शहरी मतदाराला मताची किंमत समजते. केजरीवालांसारखा सामान्य माणूस सकारात्मक विचारांनी निवडणुकीला सामोरा जात असेल, आशावादी चित्र निर्माण करीत असेल, तर त्याला विजय मिळणारच. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन लोकांची कामे केली. कुणाचे रेशन कार्ड, कुणाचे आधार कार्ड, कुणाचे लायसेन्स काढण्यासाठी मदत करणे, लोकांच्या अडीअडचणी नोंदवून ठेवणे, अशी कामं केली. कामांच्या प्रगतीचा सातत्याने मागोवा घेतला. समस्यांचा डेटा तयार करण्यासाठी दोन माणसांची खास नियुक्ती पक्षाने केली. असे घराघरात पोहोचणारे, तळागाळात काम करणारे कार्यकर्ते काँग्रेस आणि भाजपकडे नाहीत. एक सुंदर यंत्रणा ‘आप’ने निर्माण केली, त्याचंच हे यश. अशी छोटी कामे करणारे एजंट आणि प्रशासन यांच्यात साटेलोटे असल्यानेच भ्रष्टाचार वाढतो. तिथेच ‘आप’ने प्रहार केला.- संदीप जपताप, जिल्हाध्यक्ष, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासमोदींच्या रूपाने एकाधिकारशाहीची लाट येऊ पाहत होती, त्याला दिल्लीतच ब्रेक लागला आहे. जनता शहाणी आहे. ती एकाधिकारशाही खपवून घेणार नाही. अर्थात, हा इशारा जनतेने केजरीवालांनाही दिला आहे. राक्षसी बहुमत मिळाले तर ‘आम्हीच राजे’ असे समजता कामा नये. भारतीय लोकशाही सशक्त असल्याचे हे लक्षण आहे. ओबामांच्या भेटीची अवास्तव जाहिरात, मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून किरण बेदींच्या नावाची घोषणा आणि मोदींचा महागडा सूट या तीन गोष्टींची प्रतिक्रिया निकालात उमटली, असे दिसते. भाजपसह सर्वच पक्षांनी ‘आप’च्या विजयाचे स्वागत केले पाहिजे. कारण, एका वेगळ्या, आशादायक राजकारणाची सुरुवात ‘आप’ने केली आहे.- जयंत उथळे, लोकायन प्रकाशन