या वेळी, पालिकेचे बांधकाम सभापती हणमंतराव पवार, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, एनव्हायरो नेचर फ्रेंड क्लबचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशिद, विनायक कदम, विनायक भस्मे व नागरिक उपस्थित होते.
शिवीजी हौसिंग सोसायटीतील उद्यानात विविध प्रकारचे वृक्ष आहेत. यात औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. उद्यान व सोसायटी परिसरातील झाडांचे अत्यंत चांगल्या प्रकारे संगोपन करण्यात येते. त्यामुळे घराजवळ उगवलेल्या हुंबराच्या झाडाचे शिवाजी हौसिंग सोसायटीच्या उद्यानात पुनर्रोपण करण्यात आल्याचे सागर बर्गे यांनी सांगितले. साधरणत: एक ते दीड वर्षाचे हे झाड आहे.
फोटो : ०७केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडच्या शिवाजी हौसिंग सोसायटीतील उद्यानात हुंबराच्या झाडाचे पुनर्रोपण करण्यात आले. या वेळी हणमंतराव पवार, चंद्रकांत जाधव, सागर बर्गे, प्रा. जालिंदर काशिद उपस्थित होते.