शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

माणसं जंगलात.. अन् वन्यप्राणी वसाहतीत

By admin | Updated: July 21, 2016 23:34 IST

वावर वाढला : अनाकलनीय घटनांनी सारेच हैराण; खाद्याच्या शोधार्थ भटकंती

दशरथ ननावरे --खंडाळा  -सातारा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत वन्यप्राण्यांबद्दल घडलेल्या घटना अनाकलनीय आहेत. मनुष्यवस्तीमध्ये वन्यप्राण्यांचा वाढलेला वावर धोक्याची घंटा मानली जात आहे. आधुनिकीकरणामुळे डोंगर आणि जंगलभागात मानवाचे अतिक्रमण वन्यजीवांसाठी अडचण ठरत असल्याने वन्यप्राणी असुरक्षितच वाटत आहेत. त्यामुळे ‘उठ मानवा, जागा हो, पाणीमात्रावर दया कर’ अशा शिकवणीची गरज भासू लागली आहे.जिल्ह्यातील पाटण येथे जखमी अवस्थेत आढळलेला अजगर, कण्हेर येथे धरण परिसरात पाण्याबाहेर आलेली मगर, गेल्या महिन्यात खंडाळा तालुक्यातील मोर्वे येथे लांडग्यांनी केलेला मेढ्यांच्या कळपावरील हल्ला आणि दोनच दिवसांपूर्वी अंदोरी येथे आढळून आलेले बिबट्याचे अस्तित्व या लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे वन्यप्राण्यांचे जीवन अडचणीत येत असल्याचे समोर आले आहे.जंगल परिसर आणि डोंगर कपारीपर्यंत मानवी वस्तीचे राहणीमान दिवसेंदिवस वाढू लागले आहे. नैसर्गिक जंगलांची जागा सिमेंटच्या जंगलांनी घेतली आहे. साहजिकच जंगलातील वन्यप्राण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांना खाद्याच्या शोधार्थ भटकावे लागत आहे. भेकराचा पाठलाग करून जखमी झालेल्या अजगरावर अद्यापही कऱ्हाड येथे उपचार सुरू आहेत. तर कण्हेर परिसरात पाण्याबाहेर आलेली मगर हाही चिंतेचा विषय आहे.अंदोरी सारख्या दुष्काळी भागात पहिल्यांदाच बिबट्याचे दर्शन घडले. खंडाळा तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या भोर, पुरंदर येथील डोंगरी भागातून हा बिबट्या आला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अन्नाच्या शोधार्थ रात्रीच्या वेळी भरकटलेल्या या जीवाची होत असलेली वाताहत कोणामुळे घडतेय याचा मागोवा घेणे गरजेचे आहे.पश्चिम घाट परिसरात असणाऱ्या वन्यजीवांचे राहणीमान बदलू लागले आहे की काय? की माणसाच्या अतिक्रमणामुळे वनसंपदा नष्ट होऊ लागल्याने आणि त्यांना आवश्यक आहार मिळत नसल्याने वन्यप्राण्यांचा वसाहतींमध्ये वावर वाढत चालला आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)वन्यजीवांचे वास्तव्य हे डोंगरभागातच असायला हवे. मात्र, अलीकडच्या काळात पश्चिम घाटातील वन्यप्राण्यांची सवय बदलू लागल्याचे दिसून येत आहे. ज्या भागात बिबट्याचे वास्तव्य निदर्शनास आले तो भाग नदीकाठचा आणि विशेषत: ऊसशेतीचा आहे. जंगलातील छोट्या प्राण्यांची संख्या कमी झाल्याने शिकारीच्या शोधार्थ बिबट्या येऊ शकतो. ऊसशेतीच्या ठिकाणी भेकर, ससे आणि अन्य प्राणी आढळून येतात. बिबट्या एकटा असले तर चिंतेची बाब नाही. मात्र, त्यांची संख्या जास्त असल्यास ते याठिकाणी राहून पैदास वाढवू शकतात. असे अनेक ठिकाणी आढळून आले आहे.- रवींद्र पवार, प्राणीमित्रअंदोरी भाग हा नदीकाठी आहे. या ठिकाणी असलेल्या बिबट्याचा वावर हा नैसर्गिक वाटत नाही. बिबट्या अन्नाच्या शोधार्थ रात्रीच्या वेळी आला असावा, अशी दाट शक्यता आहे. आमचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही सुगावा मिळाला नाही.- ए. व्ही. शिंदे, वनक्षेत्रपाल