शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST

सातारा : राज्याच्या शिक्षण संचालकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीबाबतच्या सूचना पत्राद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, त्यावर ...

सातारा : राज्याच्या शिक्षण संचालकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीबाबतच्या सूचना पत्राद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांकडून सूचना प्राप्त झाल्या नसल्याने, किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार कार्यवाही व्हावी, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्याने अनलॉकच्या चौथ्या टप्प्यामध्ये सातारा जिल्हा आहे. त्यामुळे येथील शाळा तूर्त तरी ऑनलाईन पद्धतीने भरणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याबाबतच्या सूचना माध्यमिक, प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्यानुसार शाळांनी तयारी केली आहे. समूह अध्यापनाअंतर्गत विद्यार्थ्यांचे छोटे-छोटे गट करून त्यांना शिक्षण देण्याचा पर्यायही शिक्षण विभागाने सुचविला आहे. जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये कोविड केअर सेंटर आहेत, तेथील शिक्षकांनी घरातूनच ऑनलाईन स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, अशी सूचना शिक्षण विभागाने केली. मात्र, राज्याच्या शिक्षण संचालकांनी शैक्षणिक वर्ष प्रारंभाबाबत दि. १४ जूनच्या पत्राद्वारे काही सूचना शिक्षण उपसंचालकांना केल्या आहेत. त्यामध्ये शिक्षकांच्या उपस्थितीची टक्केवारी निश्चित केली आहे. त्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आदेश काढण्यात यावेत, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

जिल्ह्यातील शाळा...

जिल्हा परिषद शाळा - २३६३

विनाअनुदानित शाळा - १३८९

शिक्षक - २७५७८

शिक्षकेतर कर्मचारी - १२८६

संचालकांचे पत्र काय?

शिक्षण संचालकांच्या पत्रामध्ये, इयत्ता पहिली ते नववी, अकरावीच्या ५० टक्के आणि दहावी, बारावीच्या १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहील. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के राहील. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांची १०० टक्के उपस्थिती राहील, असे म्हटले आहे.

जिल्हा परिषदेचे पत्र काय?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण द्यावे. मात्र, शाळेतील उपस्थितीच्या टक्केवारीचा शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रामध्ये उल्लेख नव्हता.

कोट :

कोरोनाच्या ड्युटीमुळे एकूण शिक्षकांच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी शिक्षक हे शाळांमध्ये जाण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे शिक्षण संचालकांच्या सूचनांची माहिती देणारे पत्र काढण्याची आवश्यकता वाटत नाही.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी

शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि ऑनलाईन शिक्षणाबाबत प्राथमिक शाळांना सूचना दिल्या आहेत. प्राथमिक शिक्षकही कोरोना ड्युटीवर आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शाळांना पत्र पाठविण्यात येईल.

- रवींद्र खंदारे, गटशिक्षणाधिकारी, कोरेगाव

शिक्षकांची कसरत

शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार शिक्षकांच्या उपस्थितीबाबत कार्यवाही व्हावी. त्याबाबतचे पत्र शाळांना पाठविण्यात यावे. त्यामुळे शाळा, शिक्षकांमधील संभ्रमावस्था दूर होईल.

- राजेश बोराटे, फलटण

जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता, शिक्षण संचालकांचा आदेश योग्य वाटतो. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. याबाबत शिक्षण विभागाने शाळांना लेखी सूचना द्याव्यात.

- प्रवीण घाडगे, कोरेगाव