शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुशल मजुरांअभावी गुºहाळघरे बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:12 IST

मलटण : चवीनं गूळ खाणाऱ्यांना त्यामागचे कष्ट माहीत नसते. गुळात असणारे कॅल्शिअम हाडे मजबूत करतात. तसेच गूळ शेतकरी व गुºहाळ चालकालाही आर्थिकदृष्ट्या मजबूत करतो; पण ही स्थिती मागील चार-पाच वर्षांत पूर्णपणे बदलली आहे. गुºहाळघरे समस्यांच्या गर्तेत सापडली आहेत. फलटण तालुक्यातील वडजल, साखरवाडी, खराडेवाडी सुरवडी परिसरात असणारी गुºहाळे कुशल मजुराअभावी बंद ...

मलटण : चवीनं गूळ खाणाऱ्यांना त्यामागचे कष्ट माहीत नसते. गुळात असणारे कॅल्शिअम हाडे मजबूत करतात. तसेच गूळ शेतकरी व गुºहाळ चालकालाही आर्थिकदृष्ट्या मजबूत करतो; पण ही स्थिती मागील चार-पाच वर्षांत पूर्णपणे बदलली आहे. गुºहाळघरे समस्यांच्या गर्तेत सापडली आहेत. फलटण तालुक्यातील वडजल, साखरवाडी, खराडेवाडी सुरवडी परिसरात असणारी गुºहाळे कुशल मजुराअभावी बंद असून, आता फक्त अवशेष बनून राहिली आहेत.फलटण तालुक्यात तब्बल चार कारखाने जोमाने ऊस गाळप करत असताना गुºहाळघरांना मात्र चांगलीच घर-घर लागली आहे. दिवसेंदिवस अशा गुºहाळांची संख्या कमी होत आहे. याचे मुख्य कारण शोधले असता सर्वात मोठी आणि प्रामुख्याने कुशल व सक्षम मजुरांची असणारी वानवा लक्षात येते. एक छोटे गुºहाळ चालविण्यासाठी दोन गुळवे, चूल चालवण्यासाठी दोन-तीन चुलवे, चार ते पाच लोक रसापासून गूळ साच्यात भरण्यासाठी लागतात. आणखी चार-पाच लोक इतर कामासाठी लागतात. त्यामुळे अशा कुशल कामगारांची वानवा सतत जाणवू लागल्याने मजुरांअभावी गुºहाळे बंद आहेत.गूळ व्यवसाय हा कारखान्याप्रमाणेच एकरी किती उतारा मिळतो? यावर अवलंबून असतो. कारखान्यात उतारा काढण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा असते. गुºहाळत मात्र नशीबच उतारा सांगत असते. कमी उतारा असणारा ऊस कारखाने नेत नाहीत. तो सगळा ऊस गुºहाळांना दिला जातो.फलटण तालुक्यात सद्य:स्थितीत नव्वद टक्के गुºहाळे बंद आहेत. गुजरात, मुंबईच्या बाजारात गुळाला दर मिळत नाही, परिणामी तोटा होत असल्याचे चालक सांगतात.पावकिलोचीही ढेप...इतक्या सर्व समस्या असताना खराडेवाडी परिसरात नवीन तंत्रज्ञान वापरून गूळ तयार केला जात आहे. पूर्वी गूळ आठ ते दहा किलोच्या ढेपेत मिळायचा. आता मात्र तंत्रज्ञान पुढे जात असून, किलो-अर्धा किलो तसेच अगदी पाव किलोचीसुद्धा ढेप उपलब्ध आहे.पेढा गूळाला मागणीखराडेवाडीच्या गुºहाळ घरात नवीन पेढागूळ तयार होत आहे. त्यात वेलदोडे, मसाला टाकून पेढ्याच्या आकाराच्या ढेपा तयार करण्यात येत आहेत. याला परदेशात चांगली मागणी आहे.