शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

अहवालाच्या पुढं घोडं सरकेना!

By admin | Updated: December 25, 2014 00:14 IST

अवकाळी नुकसान : निसर्गाचा कोप सुरुच

सातारा : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील कऱ्हाड, जावळी, फलटण, खंडाळा या तालुक्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी प्राथमिक अहवालाच्या पुढं पंचनाम्याचं घोडं सरकेना, अशी स्थिती आहे. नोव्हेंबर महिन्यातील नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल शासन दरबारी सादर झाला असला तरी अद्याप त्याचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले नाही.नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील १३३ शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. एकट्या फलटण तालुक्यात ३८.३७ हेक्टर क्षेत्रातील ऐंशी शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले व जावळी तालुक्यातील ५३ शेतकऱ्यांचे ६.९0 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद सध्या शासन दरबारी झाली आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यातही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यापैकी ११ ते १५ डिसेंबर या कालावधीतील नुकसानीच्या पंचनाम्यांची प्राथमिक माहिती प्रशासनाकडे तयार आहे. जिल्ह्यातील एकूण ३४ गावांतील १ हजार १३१ शेतकऱ्यांचे ४३५.६९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये खंडाळा, फलटण, कऱ्हाड तालुक्यांचा समावेश आहे.पिकांच्या नुकसानीसाठी १०.४६ लाखांच्या अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. सातारा जिल्ह्यातील १६ गावांमधील १३३ शेतकऱ्यांना शासनाकडून उपलब्ध झाल्यास या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. मात्र, अनुदानाबाबत शासनाने ठोस निर्णय घेतला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (प्रतिनिधी)