शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

घोडे मार्केटमध्ये; पोनी स्टँड रिकामा!

By admin | Updated: January 2, 2015 23:58 IST

गर्दीत लागतो धक्का : धूळ, दुर्गंधीमुळेही उद््भवतात वादाचे प्रसंग--घोड्याला टाच पाहुण्यांना जाच

सातारा : महाबळेश्वरच्या घोडेवाल्यांशी पर्यटक आणि इतरांची बाचाबाची होण्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केल्यास अरुंद आणि गर्दीच्या रस्त्यांवरून घोड्यांची होणारी ये-जा याच मुद्द्याजवळ कोणीही जाऊन पोहोचतो. पालिकेनं दिलेल्या ‘पोनी स्टँड’वर घोडे उभेच नसतात, तर ‘सवारी’ शोधत ते भरबाजारातून फिरतात आणि कलह उद््भवतो. संघर्षाची तीन प्रमुख कारणे असल्याचा निष्कर्ष काढता येतो. घोड्याचा धक्का लागणं, धूळ आणि दुर्गंधी. सर्वाधिक घोडे वेण्णा लेकवर उभे असतात. सायंकाळच्या वेळी वेण्णा धरणाच्या वरील मैदानावर घोडे पळविले जातात. त्यामुळं उडणाऱ्या धुळीमुळं तिथल्या झाडांवरही धूळ बसलेली स्पष्ट दिसते. हिरवी झाडं लाल झाली आहेत. शेजारीच पालिकेचा टोलनाका आहे. तेथील कर्मचाऱ्यांनी नाक्याच्या भोवती हिरवं कार्पेट टाकून धुळीपासून संरक्षण मिळवलंय. वेण्णा लेकचं पाणी शहराला पिण्यासाठी पुरवलं जातं. शेजारीच उडणारी धूळ आणि घोड्याची लीद थेट पाण्यात मिसळते. पाणी शुद्धीकरणानंतर शहराला पुरवण्यात येत असलं, तरी मुळात ते खराबच होऊ नये, याची काळजी घेतली जात नाही. (प्रतिनिधी)घोडे बांधण्यास जागेची मागणीमुंबई पॉइंटवर घोडा आतपर्यंत नेण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी घोडेवाल्यांनी मोर्चा काढला होता. तेथे दोन पायांवर घोड्याला उभे करून फोटो काढणाऱ्यांची संख्या मोठी असते. परंतु हा भाग वन विभागाच्या ताब्यात असल्यामुळे घोडेवाल्यांच्या मागणीविषयी चर्चेचे आश्वासनच पालिका देऊ शकली. या मागणीचे पुढे काहीच झाले नाही. ‘पोनी स्टँड’ म्हणून दिलेली जागा फारच अपुरी असून, तिथे दीडशे घोडे मावू शकत नाहीत. माथेरानप्रमाणं मोठी जागा देऊन शेड उभारावी, अशी घोडेवाल्यांची मागणी आहे. काही ठळक नोंदीमहाबळेश्वरात सुमारे दीडशे घोडे आहेत.घोड्यांच्या किमती दोन ते चार लाखांच्या दरम्यान आहेत.सामान्यत: सायंकाळच्या वेळी घोडसवारीचा व्यवसाय होतो.भल्या सकाळी घोडा भाड्याने घेऊन काहीजण चायनामेन वॉटरफॉलपर्यंत रपेट करतात.पालिकेचे काही सफाई कामगार दिवसभर कचरा उचलून सायंकाळी घोड्याचा व्यवसाय करतात. घोड्यासाठी पालिकेचा वार्षिक कर फक्त दोनशे रुपये आहे. तुलनेने घोड्यांमुळे होणारी घाण साफ करण्याचे काम खूपच मोठे आहे.अनेक घोडेवाल्यांना घोडा ठेवण्यास जागा नाही. त्यांनी पालिका, वन विभाग किंवा खासगी जागेत शेड उभारले आहेत. पावसाळ्यात घोडे महाबळेश्वरात न ठेवता वाई किंवा साताऱ्याला कोणाला तरी सांभाळायला दिले जातात.