शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

बटाट्यासह कांद्यावरही अस्मानी संकट

By admin | Updated: December 19, 2014 00:32 IST

शेतकरी हवालदिल : वातावरणातील बदलाचा परिणाम

खटाव : वातावरणात होत असलेल्या बदलामुळे खटावसह परिसरातील शेतकऱ्यांच्या बटाटा पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तवली जात आहे. त्याचबरोबर ज्वारी, हरभरा, गहू आदींसह बटाटा पिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या अस्मानी संकटामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.बटाट्याच्या रोपावर पडलेल्या रोगामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार असल्यामुळे आर्थिक संकटात सापडण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.खटाव तालुक्यात तसेच परिसरात बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणात केले जाते. बटाट्याच्या पिकाला यावर्षी चांगला दर मिळू लागल्यामुळे शेतकरी आनंदीत होता. बटाटा लागवड करताना शेतकरीऱ्यांनी बियाण्यांसाठी क्विंटलला तीन हजार पाचशे रुपये दराने बियाणे खरेदी करून बटाट्याची लागण केली आहे. अचानक पडणारा पाऊस, कोंदट हवामान तसेच थंडी बरोबरच सकाळी पडणारे धुके या सर्वाचा परिणाम बटाट्याच्या रोपांवर झालेला दिसतो. बहुतांश बटाट्याचे प्लॉटमध्ये बटाट्याची रोपे जागेवरच बसलेली आहेत. तर त्याची पाने सुकून गेलेली दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी आता बटाटा पीक वाचविण्यासाठी औषधफवारणीच्या लगबगीत आहे. बटाटा बरोबरच कांदा उत्पादक शेतकरीही कांद्यावर पडत असलेल्या टाका रोगामुळे चिंतातूर झाला आहे. कांद्याची लागवड करताना शेतकरी तीन हजार रुपयांप्रमाणे बियाणे विकत घेऊन कांद्याची लागण केली; परंतु हवेतील होणारा बदल तसेच सकाळी पडणारे धुके यामुळे कांद्याच्या पातीवर टाका रोगाच्या प्रादूर्भावाने कांद्याची पात जागेवरच मुरगळून जात आहे. नगदी पिके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कांदा व बटाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या मात्र तोंडचे पाणी पळाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक या हवामानाच्या बदलत्या परिस्थितीमुळे धोक्यात आली आहे. शेतकऱ्याला रोगापासून आपली पिके वाचविण्यासाठी बरीच मेहनत करावी लागत आहे. या अस्मानी संकटामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हवामानात असाच जर बदल होत राहिला तर गहू, हरभरा या पिकांवरही रोग पडण्याची भीती लागली आहे. (वार्ताहर) पीक वाचविण्यासाठी औषधफवारणीकधी थंडी, कधी कडाक्याचे ऊन या बदलत्या हवामानामुळे या पिकावर रोग पडू लागला आहे. करपा व तुडतुडे रोगामुळे रोपांची वाढ झाली नाही, तसेच बटाट्याचीही वाढ झाली नाही. त्यामुळे तीस क्विंटल बटाट्याची लागण करूनही हाती अवघ्या तीस पोतींवर समाधान मानावे लागणार आहे. बटाट्याचे पीक वाचविण्यासाठी पाच-पाच वेळा औषधफवारणी करूनही बटाट्याच्या रोपावरील कीड नष्ट झाली नाही.बटाटा पिकातून उत्पन्न चांगले मिळते, हे जरी खरेअसले तरी बटाटा बी खरेदीपासून त्याची लागवड करून त्यात लागणारी मेहनत आदीसह एका एकराला चाळीस हजारांपर्यंत खर्च होतो. त्यामुळे हे पीक घेताना जेवढे कष्ट आहेत, त्यातच हा असा अचानक पडणारा रोगामुळे आम्हा शेतकरीऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. - किशोर डंगारे, शेतकरी