मसूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरीच आहेत. या विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात राहावे यासाठी जिल्हा परिषद शाळा कोणेगावच्या शिक्षिका प्रमिला तरंगे यांनी घरोघरी शाळा हा उपक्रम राबवून शाळेचा प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे, असे गौरवोद्गार शाळा व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शक राजकुमार चव्हाण यांनी केले.
ते कोणेगाव, ता. कऱ्हाड येथील प्राथमिक शाळेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या घरोघरी शाळा उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सरपंच रमेश चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन चव्हाण, मुख्याध्यापक गोरख गिरी उपस्थित होते.
या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, ‘मुख्याध्यापक गोरख गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने ऑनलाइन, ऑफलाइन अध्यापन, ऑडिओ कथामालिका, रविवार माझ्या आवडीचा असे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये शाळेची रुची कायम ठेवून पटाचा चढता आलेख ठेवला आहे. घरोघरी शाळा या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रास्ताविकात प्रमिला तरंगे यांनी घरोघरी शाळा उपक्रमाची पार्श्वभूमी व उपयुक्तता सांगितली. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच रमेश चव्हाण यांनी केले. सरपंच रमेश चव्हाण, विजया भोपते, रोहिणी बाईंग आदींनी मनोगत व्यक्त केले. माजी उपसरपंच संदीप चव्हाण, समाधान चव्हाण, प्रदीप शेलार, सुभाष बाईंग, रोहिणी बाईंग, विद्यार्थी देवराज बाईंग तसेच पालक व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. वसंत शेडे यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णत हिरवळे यांनी आभार मानले.
फोटो २६मसूर
कोणेगाव येथे घरोघरी शाळा उपक्रम उद्घाटनप्रसंगी सरपंच रमेश चव्हाण, राजकुमार चव्हाण, संदीप चव्हाण, मुख्याध्यापक गोरख गिरी उपस्थित होते.