शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

इतिहास दृष्टिक्षेपात : कऱ्हाडमध्ये आढळला शिवकालीन गद्धेगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 12:28 IST

History Sarata Krarad : कऱ्हाड येथील शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात शिवकालीन गद्धेगाळ शिल्प सातारा येथील कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. गौतम काटकर आणि मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना आढळून आला आहे. हा गद्धेगाळ १६५३ मधील असून त्यावर मौजे सेगाव येथील जमीन दान दिल्याचा उल्लेख आढळतो.

ठळक मुद्दे इतिहास दृष्टिक्षेपात : कऱ्हाडमध्ये आढळला शिवकालीन गद्धेगाळमिरज इतिहास मंडळाच्या अभ्यासकांचे संशोधन

सातारा : कऱ्हाड येथील शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात शिवकालीन गद्धेगाळ शिल्प सातारा येथील कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. गौतम काटकर आणि मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना आढळून आला आहे. हा गद्धेगाळ १६५३ मधील असून त्यावर मौजे सेगाव येथील जमीन दान दिल्याचा उल्लेख आढळतो.प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर हे कऱ्हाड परिसरात संशोधन करीत असताना त्यांना शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात गद्धेगाळ आढळून आला. तो उलटा करून जमिनीत पुरून ठेवला होता. हा गद्धेगाळ १२ ओळींचा असून, त्यावर सके १५७५ म्हणजेच १६५३ असा कालोल्लेख आहे.

मौजे सेगाऊ येथील जमीन दान दिली असून त्यावरील कर माफ केल्याचा हा उल्लेख आहे. या लेखाच्या शेवटी हे लिहिविल येणे न पाळी त्यास गडव असे शापवचन कोरले आहे. अक्षरवाटिका आणि भाषाशैली ही शिवकालीन आहे. बारा ओळींच्या मजकुराबरोबरच गाढव आणि एका व्यक्तीचे चित्र शिल्पांकित केले आहे, तर वरील बाजूस सूर्य-चंद्र कोरले आहेत.श्री. शिवाजी विद्यालयाचे तत्कालीन इतिहास विषयाचे शिक्षक भगवानराव घारगे यांनी विद्यालयात पुरातन संग्रहालय केले होते. भाळवणी येथील ११७३ चा कलचुरी राजा रायमुरारी सोयीदेव यांचा कानडी लेख आणि यादव नृपती दुसरा सिंघण यांचा १२१६ मधील देवनागरी लेख येथे आहे. हे दोन्ही लेख अभ्यासक वि. भि. कोलते यांनी प्रसिद्ध केले आहेत. मात्र, त्या शेजारीच हा गद्धेगाळ होता.

तो आजवर अप्रकाशित होता. लवकरच या गद्धेगाळावरील लेखावर शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या संशोधनासाठी श्री शिवाजी विद्यालयाचे अध्यक्ष जयंतराव काका पाटील, मुख्याध्यापक बी. बी. साळुंखे, सातारा येथील कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड, डॉ. आर. बी. सातपुते यांचे सहकार्य लाभले.गद्धेगाळ म्हणजे काय?गद्धेगाळ ही शिलालेखांसारखीच लेखयुक्त शिल्पे असतात. शिलालेखांत लिहिलेले नियम, आज्ञा मोडू नये, नागरिकांनी त्याचे पालन करावे यासाठी शेवटी शापवचनासारखी काही वाक्ये लिहिली असतात. त्यामध्ये गाढवावरून दिलेली शिवी असते आणि या शिवीत लिहिल्याप्रमाणे गाढव आणि स्त्रीचे शिल्पांकनही केलेले असते.

प्रथमदर्शनी हे शिल्प आणि त्यावरील शिवीसदृश वाक्य हे अशिष्ट वाटले तरी त्यामागे केवळ शिवीगाळ करणे हा उद्देश नसतो, तर राजाज्ञा अथवा नियम मोडले तर कोणते परिणाम भोगावे लागतील, याचा इशारा देणारी ही वाक्ये असतात. असे गद्धेगाळ हे गावाच्या प्रमुख ठिकाणी ठेवलेले असतात. 

टॅग्स :historyइतिहासSatara areaसातारा परिसरKaradकराड