शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लंडनमधील ऐतिहासिक वाघनखे साताऱ्याच्या संग्रहालयात विसावणार!, इतिहासप्रेमींमध्ये उत्कंठा 

By सचिन काकडे | Updated: June 17, 2024 12:34 IST

जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार आगमन

सचिन काकडेसातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे राजधानी साताऱ्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या वाघनखांसाठी संग्रहालयात तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र दालनाचे काम अंतिम टप्प्यात असून, सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही वाघनखे साताऱ्यात येतील, अशी माहिती संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेल्या वाघनखांना ऐतिहासिक महत्त्व आहे. ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जाणार आहेत. वाघनखे भारतात आल्यानंतर ती सातारा, कोल्हापूर व नागपूर येथील संग्रहालयात एक-एक वर्षासाठी ठेवली जाणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून इतिहासप्रेमी या वाघनखांची आतुरतेने वाट पाहत होते; परंतु सुरक्षेसह अन्य कारणांमुळे वाघनखांचा प्रवास लांबणीवर पडला. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडून वाघनखे ठेवण्यासाठी काही निकष व अटी घालण्यात आल्या. पुरातत्त्व विभागाकडून सर्व निकषांची पूर्तता करण्यात आल्याने वाघनखे भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला. या वाघनखांसाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वतंत्र दालन बनविण्यात आले आहे. या ठिकाणी ही वाघनखे दहा महिने ठेवली जाणार असून, इतिहासप्रेमी सातारकरांना ती प्रत्यक्षात पाहता येणार आहेत.

अशी आहे दालनाची व्यवस्था..

  • वस्तुसंग्रहालयात वाघनखांसाठी स्वतंत्र दालन
  • वाघनखे ठेवण्यासाठी विशिष्ट पेटी दिल्ली येथे तयार करण्यात आली
  • पेटीचा खालचा भाग पोलादी व वरील भाग काचेचा पारदर्शक आहे
  • ही काच लॅमिनेटेड व अत्यंत भक्कम अशी आहे
  • या दालनाभोवती सीसीटीव्ही कॅमेरे व बंदूकधारी सुरक्षारक्षक
  • सुरक्षेसाठी वाघनखांच्या पेटीभोवती सेन्सर
  • प्रतापगडावरील शिवपराक्रमाचे दालनातील भिंतीवर रेखाचित्र

वाघनखे लंडनवरून मुंबई व तेथून थेट साताऱ्यात आणली जातील. पुरातत्त्व विभागाकडून या वाघनखांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली गेली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाघनखे साताऱ्यात येतील. तिथून पुढे दहा महिने ही वाघनखे नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली जातील. - प्रवीण शिंदे, अभिरक्षक

टॅग्स :Satara areaसातारा परिसर