शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक भवानी तलवारीचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जल मंदिरातील भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. हा ऐतिहासिक ओळखला जाणारा सोहळा पाहण्यासाठी शेकडो सातारकरांनी गर्दी केली होती.यावेळी सार्वजनिक मंडळांच्या देवींची मिरवणूकही निघाली. त्यानंतर अनेक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी जलमंदिरात झालेल्या भवानी तलवार पूजन सोहळ्याला राजमाता कल्पनाराजे भोसले, खासदार उदयनराजे ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जल मंदिरातील भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. हा ऐतिहासिक ओळखला जाणारा सोहळा पाहण्यासाठी शेकडो सातारकरांनी गर्दी केली होती.यावेळी सार्वजनिक मंडळांच्या देवींची मिरवणूकही निघाली. त्यानंतर अनेक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी जलमंदिरात झालेल्या भवानी तलवार पूजन सोहळ्याला राजमाता कल्पनाराजे भोसले, खासदार उदयनराजे यांच्या पत्नी दमयंतीराजे, चिरंजीव वीरप्रतापसिंहराजे आदी राजघराण्यातील मंडळी उपस्थित होती.पूजन केल्यावर ही भवानी तलवार फुलांनी सजविलेल्या पारंपरिक लाकडी पालखीत ठेवून मिरवणुकीने पोवई नाका येथे आणण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी सनई-चौघडा, शिंग-तुताºयांचा समूह, राजघराण्यातील मानकरी, नऊवारी साडी नेसलेल्या मुली, तसेच फेटाधारी युवक होते. राजपथावरून ही मिरवणूक पोवईनाक्यावर आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या तलवारीचे शास्त्रशुद्ध पूजन उदयनराजे भोसले व वीरप्रतापसिंहराजे भोसले यांनी केले. वेदमूर्ती शास्त्रींनी पौरोहित्य केले. सार्वजनिक मंडळांच्या देवींचे विसर्जन कृत्रीम तळ्यात करण्यात आले. अनेक मुख्य रस्ते मिरवणुकीमुळे बंद करण्यात आले होते.पारंपरिक वेशभूषेने शाही मिरवणूकजलमंदिरपासून निघालेल्या शाही मिरवणुकीत हजारो सातारकर सहभागी झाले होते. त्यातील अनेकांनी पारंपरिक वेशभुषा परिधान केली होती. त्यामुळे या मिरवणुकीला एक वेगळी ऐतिहासिक किनार लाभली होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.